आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहेरी विचित्र अपघातात मनमाडजवळ ८ जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - मनमाड-मालेगाव मार्गावर मंगळवारी मध्यरात्री चाेंढी घाटातच झालेल्या ट्रक-टॅक्सी व टेम्पाे ट्रॅव्हलर यांच्यातील ितहेरी अपघातात ८ जण जागीच ठार, तर २० जण जखमी झाले. मृतांमधील ६ जणांची अाेळख पटलेली अाहे. मृतांमध्ये मनमाडच्या तांबाेळी कुटुंबीयांमधील तीन जणांचा मृत्यू झाला. सर्व जखमींना उपचारांसाठी मनमाड, मालेगाव व नाशिक येथे पाठविण्यात अाले अाहे.


मनमाडपासून १२ किलाेमीटरवर मध्यरात्री मालेगावकडे जाणाऱ्या ट्रकवर मनमाडकडे येणारी टेम्पाे ट्रॅव्हलर अादळली. त्यापाठाेपाठ काळी पिवळी टॅक्सीदेखील चालकाला िनयंत्रित न झाल्याने दाेन्ही अपघातग्रस्त वाहनांवर अादळली. ितन्ही वाहनांचे क्रमांकदेखील अंधारात कळू शकत नव्हते.
अतिक रमजान तांबोळी (३५, मनमाड), नाजनीन अतिक तांबोळी (१६), हसिना रशीद तांबोळी (६०, रा. कोळपेवाडी), तनवीर निसार तांबोळी (४), सायना निसार तांबोळी (८) हे पाच जण या अपघातात ठार झाले. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी अडीच वाजता नेहरू भवनजवळून एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. येथील मुस्लिम स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली होती.

व्यावसायिकाचा मृत्यू
अतिक तांबोळी हा होतकरू व्यावसायिक होता. सुभाषरोडवर हातगाडी लावून विविध वस्तू विकण्याचा व्यवसाय करीत होता. तो ठिकठिकाणी दुकाने लावून उपजीविका करत होता. मनमाड येथील परिवार व कोळपेवाडी येथील सासरची मंडळी यांच्यासमवेत तो मुलीसह अजमेर व आग्रा येथे दर्शनासाठी गेला होता. तेथून परतताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

मालेगावात तिघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
मालेगाव - कुंदलगाव शिवारात मंगळवारी रात्री ट्रक, टेम्पाे ट्रॅव्हल्स व मारुती व्हॅन यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मालेगाव येथील तिघांवर बुधवारी दुपारी शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात अाले.
संगमेश्वर भागात रहाणारा प्रशांत खैरनार (महाजन) हा २७ वर्षीय तरुण मारुती व्हॅन चालवून अाई व अाजीचा सांभाळ करत हाेता. अपघातात या कुटूंबातील कर्ता व्यक्तीच हिरावला गेल्याने खैरनार कुटूंब उघड्यावर पडले अाहे. किल्ला परिसरात रहाणारे माेहंमद अारिफ माेहंमद फारूख हे मुंबई येथे स्वत:साठी अाैषधे अाणण्यासाठी गेले हाेते. तर नयापूरा भागातील माेहंमद कुद्दूस माेहंमद हाजी शफीक हे अापल्या अाजारी भावाला भेटून मुंबईहून मालेगावकडे परतत हाेते. या दाेघांवर काळाने झडप घातल्याने त्यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डाेंगरच काेसळला अाहे. अपघातप्रकरणी येथील ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
.
माेहंमद अारिफ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तर माेहंमद कुद्दूस यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली असा माेठा परिवार अाहे.