आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक कर्करोगदिन: कॅन्सरच्या पहिल्या स्टेजवरील ८० टक्के रुग्ण ठणठणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातील कॅन्सरच्या ८० हजारांपैकी पहिल्या स्टेजवरील ८० टक्के रुग्ण ठणठणीत बरे होतात, अशी दिलासादायक माहिती शहरातील कॅन्सर तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. दुस-या तिस-या पातळीवरील ४० टक्के रुग्ण बरे होत असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतात वर्षाला आठ ते दहा लाख रुग्णांना कॅन्सर झाल्याचे आढळून येते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात भारतात एक लाख लोकांमागे ९० जणांना कॅन्सरची लागण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हेच प्रमाण पाश्चात्य देशात एक लाख लाेकांमागे ४०० एवढे आहे. वेळीच योग्य काळजी आणि व्यसनांना दूर ठेवले नाही, तर २०२० मध्ये भारतात प्रत्येक कटुंबात एक कॅन्सरचा रुग्ण असेल, अशी भीतीही आरोग्य संघटनेने वर्तविली असल्याचे कॅन्सर तज्ज्ञांनी सांगितले. कॅन्सरच्या अवस्थेत कॅन्सरोत्तेजके थेट सुदृढ पेशींवर आघात करतात या पेशी अॅबनॉर्मल होतात. या अॅबनॉर्मल पेशींची वाढ ही अनियंत्रित पद्धतीने होते. त्यांच्यापासून गाठी तयार व्हायला सुरुवात होते. पुढे या गाठी लिसका ग्रंथी रक्ताद्वारे यकृत, फुफ्फुस, मेंदू हाडांत प्रवेश करतात कॅन्सरची लागण हाेते. शस्त्रक्रिया, रेडिआेथेरपी, केमोथेरपी, हार्मोनल थेरपी टार्गेट थेरपीद्वारे कॅन्सरवर त्याच्या स्टेजनुसार अत्याधुनिक पध्दतीने रुग्णांवर उपचार केले जातात.

अचूक निदानासाठी पेट-सिटी स्कॅन
कॅन्सरच्याअचूक निदानासाठी पेट सिटी स्कॅन (पाेझीट्रॉन इमिशन टोमोग्राफी) हे अत्याधुनिक तंत्र आहे. ज्याच्या आधारे अचूक निदान होण्यास मदत होते. हे तंत्र अगदी सोपे वेदनारहीत आहे. आजवर सर्वात प्रगत विकसित अशी प्रणाली म्हणून याचा उल्लेख करता येईल.

तरुणांना लागण तोंडाच्या कॅन्सरची
तरुणांमध्येजीभ, टाळू जबड्याच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. दारू, सुपारी, तिखट पदार्थ, तंबाखुचे सेवन, धुम्रपान हे या कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. त्यात २५ वर्षे वयाेगटातील तरुणांना कॅन्सर हाेत असल्याचे समोर येत आहे.

महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक
भारतातमहिलांमध्ये आढळणारा दुस-या क्रमांकाचा कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर. याचे प्रमाण शहरी भागात सर्वाधिक असून, त्यात २० महिलांमध्ये एका महिलेला तर, ग्रामीण भागात ५० महिलांमागे एका महिलेस या कॅन्सरची लागण होत आहे. फास्टफूडस‌्चे अधिक सेवन. चरबीचे अधिक प्रमाण, अनियमित मासिक पाळी, पहिले मूल उशिराने होणे, स्थूलपणा व्यसन हे स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमुख कारणे आहे.

वेळीच उपचार घ्या
प्रामुख्यानेयोग्य आहार व्यसने टाळली तर कॅन्सरची लागण होत नाही. अत्याधुनिक उपचाराने कॅन्सर बरा होतो. डाॅ.राज नगरकर, क्युरी मानवता कॅन्सर रिसर्च सेंटर

तरुणांमध्ये प्रमाण वाढले
उपचारानंतरहीज‌खम बरी हाेणे, गाठ असल्यास झपाटयाने वाढ होणे, तोंडातून रक्त येणे असे आढळल्यास डाॅक्टरांशी संपर्क साधावा. डाॅ.विनायक शेणगे, कॅन्सर तज्ज्ञ

आजार संसर्गजन्य नाही
कॅन्सरसंसर्गजन्य नसून, तो पूर्णपणे बरा होतो. योग्य उपचार घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगु शकतो. डाॅ.किरण पाटील, कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञ, सुयश हॉस्पिटल

नाशिकमधील स्थिती
१०टक्के स्त्रिया १२ टक्के पुरुषांना कॅन्सरची शक्यता वर्तविण्यात आली असून, तो डोक्याचा अथवा मानेचा कॅन्सर असतो. स्तनाच्या कॅन्सरच्या एकूण रुग्णांपैकी ६० ते ७० टक्के रुग्णांचे निदान दुस-या अंतिम टप्प्यात असताना झालेले आहे. स्रोत-इंडस हेल्थ प्लस सह्याद्री हाॅस्पिटल
हे टाळा लालमांस (मटण), चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, काॅफीचे अतिसेवन, तेलकट, तिखट पदार्थ, दारू, धूम्रपान, अति गरम अति थंड पदार्थ.

हेकरा दररोज आहारात भरपूर हिरव्या पालेभाज्या फळे घ्या. मासे अंडी खा. भरपूर पाणी प्या, चीज, भात, सोयाबीन, दही आहारात घ्या. वनस्पती तेलाचा वापर करा. नियमित व्यायाम योगासन करा.