आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता : घाेटीत ८० लाखांचा ऐवज चाेरीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - घोटी येथील डहाळे ज्वेलर्सचे मालक कैलास तुकाराम डहाळे यांच्या संत नरहरीनगर येथील निवासस्थानी काेणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ५० लाख रोख आणि दागिन्यांसह तब्बल ८० लाख रुपयांचा एेवज लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. व्यवसायातील देणी देण्यासाठी अाणलेली राेकड, दागिने, सोने, चांदी, हिरे यांचा त्यात समावेश अाहे. हे कुटुंबीय तीन दिवसांपासून नवापूरला नातेवाइकांकडे होते. परतल्यानंतर त्यांना दरवाजा तुटलेला दिसला. त्यांनी घोटी पोलिसांना कळवले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.