आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर परिसरातील ८० जणांना लागली ‘म्हाडा’ची लॉटरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या ‘म्हाडा'तर्फे मंगळवारी सातपूरच्या गृहप्रकल्पासाठी लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीच्या माध्यमातून ८० जणांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या वेळी तहसीलदार संजय शिंदे, सहायक कामगार कल्याण आयुक्त संजय धुमाळ, मिळकत व्यवस्थापक बी. पी. भावसार, ‘म्हाडा’चे कार्यकारी अभियंता एस. पी. बेबडे, कनिष्ठ लिपिक रवींद्र सूर्यवंशी उपस्थित होते.
‘म्हाडा’च्या लॉटरीच्या निमित्ताने घरासाठी नशीब आजमावू पाहणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत आहे. मंगळवारी सातपूर येथील कामगार कल्याण भवनमध्ये सातपूर गृहप्रकल्पासाठी ‘म्हाडा’ने लॉटरी काढली. या लॉटरीच्या माध्यमातून ८० जणांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
‘म्हाडा’च्या वतीने ८० सदनिकांचा गृहप्रकल्प बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाला नाशिककरांचा माेठा प्रतिसाद मिळाला असून, ५०२ अर्ज ‘म्हाडा’ला प्राप्त झाले होते. त्यानुसार, मंगळवारी लॉटरी काढण्यात आली.
अल्प मध्यम उत्पन्न गटासाठी ३२ सदनिका राखीव होत्या, त्यासाठी २६५ अर्ज प्राप्त झाले होते. मध्यम उत्पन्न गट एकसाठी सदनिका राखीव होत्या, त्यासाठी १७, तर मध्यम उत्पन्न गट दोनसाठी ४० सदनिका होत्या. त्यासाठी २२० अर्ज प्राप्त झाले होते.
‘म्हाडा’ कार्यालयात पाहता येणार निकाल
‘म्हाडा’च्यासातपूर येथील गृहप्रकल्पाच्या सदनिकांसाठी मंगळवारी लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीचा निकाल गडकरी चौक येथील ‘म्हाडा’च्या कार्यालयात पाहता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...