आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात झाले ८० हजार आदिवासी रुग्णांवर उपचार, ३ हजार रुग्णांना डॉक्टर दांपत्यांनी काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेळघाट(अमरावती)- उपेक्षित भागात अापलं वैद्यकीय काैशल्य पणाला लावून ८० हजार रुग्णांवर उपचार. तब्बल २० हजार नेत्रहिनांना दिली पुन्हा सृष्टी पाहण्याची दृष्टी. अादिवासी पाड्यांवरील रुग्णांच्या  वेदनांशी नातं सांगत त्यांच्या जगण्यात हास्य फुलवणाऱ्या सेवाव्रती डाॅक्टर सातव दाम्पत्याची ही कहाणी.

हृदयविकाराचा तीव्र झटका  आलेला एक आदिवासी रूग्ण धारणीच्या सरकारी रूग्णालयात मध्यरात्री  दाखल झाला. त्यावेळी उपचार करायला एकही वैद्यकिय अधिकारी रूग्णालयात नव्हता. सुविधांचा अभाव हे मेळघाटात नवीन नाही. अमरावती चे अंतर १६० किलोमिटरवर.. ह्रदयविकाराचा अतितिव्र झटका आला तर रूग्ण दगावण्याचीच शक्यता अधिक. याेग्यवेळी उपचार मिळाले तरच रूग्ण बचावतो..अशा बिकट परिस्थितीत उपचारासाठी एका युवा डॉक्टरला पाचारण करण्यात आले.. त्याच्याकडे इसीजी मशिन व्यतिरीक्त कोणतंही साहित्य नव्हते..एमबीबीएस झाल्यानंतर आदिवासी भागात रूग्णसेवा देण्याची दुर्दम्य इछ्चाशक्तीने झपाटलेल्या या युवा डॉक्टरने धारणी तालुक्यातील कोलुपूर येथे एका झोपडीत दवाखाना सुरू केला होता.

सरकारी रूग्णालयातील अप्रशिक्षीत सहाय्यकांच्या मदतीने त्या डॉक्टरने या रूग्णावर इंजेक्शन देऊन पहाट पर्यंत उपचार केले.रूग्णाला वाचविण्यात यश आले. तेव्हापासून जराही उसंत न घेतलेल्या डॉ. आशिष सातव यांनी मेळघाटातील गंभिर आजाराने ग्रासलेल्या आणि  वाचण्याची उमेद नसलेल्या ३२४७ रूग्णांना मृत्यूच्या दाढेतून  अक्षरश बाहेर काढले. ८० हजार रूग्णांवर यशस्वी उपचार केले. १३०० हुन अधिक बालकांना कुपोषणाच्या अतितिव्र श्रेणीतून बाहेर काढले. जळलेल्या भाजलेल्या ६६९ आदिवासी रूग्णांवर यशस्वी  उपचार केले.  पत्नी डॉ. कविता  सातव एमबीबीएस. एम.एस. (नेत्र) यांंनी  मोतिबिंन्दुची यशस्वी शस्त्रक्रिया करीत २० हजारावर नेत्रहिनांना दृष्टी दिली. शेकडो अांध रूग्णांना डॉ. कविता यांनी जग दाखविले. अतिकुपोषीत श्रेणीत असलेल्या २३ महिन्याच्या लक्ष्मी नामक बालिकेवर उपचार करताना सरकारी यंत्रणेने हात टेकले. तेव्हा अतिदुर्गम भागात असलेल्या एका आदिवासी पाड्यावर लक्ष्मी समोर उदबत्ती लाऊन तिचा परिवार चमत्काराची प्रतिक्षा करीत होता.

सातवा वर्ग उत्तीर्ण झालेल्या मिराबाई या आरोग्यदुताने लक्ष्मीला डॉ. सातव यांच्याकडे दाखल केले. अवघ्या ७० दिवसाच्या उपचारानंतर लक्ष्मीचे वजन ५ किलोवरून ८ किलो झाले. न्युमोनिया सारख्या आजारावर नियंत्रण मिळविले. तेव्हा पासून मेळघाटातील ३६ गावे दत्तक घेऊन डॉ. आशिष सातव यांनी वीस आरोग्यदुतांच्या सहाय्याने कुपोषणावर नियंत्रण मिळविले. दत्तक घेतलेल्या ३६ आदिवासी गावांमधील बालमृत्यूदर ७३ टक्क्यांनी, अर्भक मृत्यूदर ६३ टक्क्यांनी आणि मातामृत्यूदर ८० टक्क्यांनी कमी करून राज्यात आरोग्यसेवेचे एक रोल मॅाडेल उभे केले.
 
 
बातम्या आणखी आहेत...