आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

821 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला अाज, दुपारपर्यंत चित्र हाेणार स्पष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीत ३१ प्रभागांतील १२२ जागांवर नशीब अाजमावत असलेल्या ८२१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (दि. २३) हाेणार अाहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत महापालिकेतील सत्तेच्या चाव्या काेणाकडे जाणार हेही बऱ्याच अंशी स्पष्ट हाेणार अाहे. 
 
दरम्यान, मतमाेजणीसाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून, पाेलिसांनीही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चाेख बंदाेबस्त ठेवला असून, शांततेत मतमाेजणीची प्रक्रिया पार पाडण्याची धडपड चालवली अाहे. 
 
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी १० वाजता मतमाेजणीची प्रक्रिया सुरू हाेणार असून, दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत एकाचवेळी मतमाेजणीला सुरुवात हाेणार अाहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रत्येक तीन प्रभाग असून, केवळ सातपूर विभागात चार प्रभाग एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अाहेत. यात प्रामुख्याने अनुक्रमानुसार १, त्यानंतर अशी स्वतंत्रपणे प्रभागनिहाय मतमाेजणी हाेईल.
 
मात्र, एका प्रभागातील चार जागांसाठी एकाचवेळी मतमाेजणी हाेईल. पहिल्या फेरीसाठी टपाली मते ईव्हीएममधील मते असे माेजणीला साधारण २५ मिनिटे लागतील. त्यानंतर साधारण पाच फेऱ्यांत निवडणूक निकाल स्पष्ट हाेईल. एका प्रभागासाठी दीड तास अपेक्षित असून, सकाळी दहा वाजता मतमाेजणी सुरू झाली तर मसाडेतीन वाजेपर्यंत ३१ प्रभागांचे निकाल जाहीर हाेतील, असा अंदाज अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी व्यक्त केला. मतमाेजणीसाठी १०१ टेबल असून, ४८८ कर्मचारी प्रक्रिया हाताळणार अाहेत. 
 
येथील मतमाेजणीचा धसका 
महापालिकानिवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रामुख्याने ४, ५, तसेच १२, १३, १४ या प्रभागांतील येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वेळेत माहिती मिळाल्यामुळे खुद्द पालिका अायुक्तही बैचेन अाहेत. त्यामुळे मतमाेजणीची प्रक्रियाही वेळेत व्यवस्थित पार पाडली जाईल का, अशी शंकाच अाहे. त्यामुळे या भागातील मतमाेजणीकडे लक्ष लागले अाहे. 
मतमाेजणीसाठी सज्ज केंद्रावर तैनात सशस्त्र पाेलिस. 
 
उमेदवारांची वाढली धडधड 
मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी उमेदवारांनी प्रभागातील कानाकाेपऱ्यात जाऊन काेठून मतदान झाले, याबाबत चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. विजयाचा कल अापल्याकडे अाहे की नाही, याची खातरजमा करताना उमेदवार दिसत हाेते. त्यामुळे अनेकांची धडधड वाढल्याचे चित्र हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...