आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा महिन्यांत 83 सोनसाखळ्यांची चाेरी, 70 गुन्हे उघडकीस अाणण्यात यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात विविध भागांत दहा महिन्यांत तब्बल ८३ साेनसाखळी चाेरीच्या घटना घडल्या अाहेत. सण-उत्सवकाळात वाढलेल्या या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण असून, पाेलिसांपुढे अाव्हान उभे ठाकले अाहे. यातील काही गुन्ह्यांची उकल करण्यात अाली असली, तरी उर्वरित गुन्ह्यांतील सराईतही लवकरात लवकर पकडले जावेत, अशी मागणी हाेत अाहे. 
 
दरम्यान, सोनसाखळी चोरी करणाऱ्या सेंधवा, भिवंडी, कांदिवली, श्रीरामपूर, हैदराबाद आणि नाशिक शहरातील गुन्हेगारांना पाेलिसांनी जेरबंद केले असून, या टोळ्यांनी केलेल्या सोनसाखळी चोरीच्या ८३ गुन्ह्यांपैकी ७० गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले अाहे. शहरात सोनसाखळीचोरांनी डोके वर काढत एकाच दिवशी पाच सोनसाखळींची चाेरी करत पोलिस यंत्रणेला खुले आव्हान दिले होते. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या घटनांची गंभीरपणे दखल घेत पोलिस ठाणेनिहाय विशेष पथकांची नेमणूक केली. सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखील पहाटेची गस्त सुरू केली. 

सरकारवाडा आणि पंचवटी पोलिसांनी मध्य प्रदेशातील सेंधवा येथे चार सोनसाखळीचोरांना अटक केली. गुन्हे शाखा सरकारवाडा पाेलिसांच्या पथकाने भिवंडी आणि कांदिवली येथील तीन संशयितांना अटक केली. हैदराबाद येथील सराईतालाही अटक करण्यात अाली अाहे. सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांतील २५ लाखांच्या मुद्देमालाचे वाटप तक्रारदारांना करण्यात आले आहे. नागरिकांना सतर्कतेचे अावाहन करण्यात अाले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...