आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 850 MLD Water Of Darana Releasing For The Marathwada

दारणातून मराठवाड्यासाठी 850 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्‍यात येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दारणा धरण समूहातून येत्या 25 मार्चला औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर आणि वैजापूर तालुक्याला नांदूरमध्यमेश्वरच्या जलद कालव्याद्वारे पिण्यासाठी 850 दशलक्ष घनफूट पाणी विशेष बाब म्हणून सोडण्यात येणार आहे. राज्य शासनाने गुरुवारी याबाबत आदेश दिले आहेत.

दुष्काळामुळे धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने नाशिकमधून मराठवाडा आणि अहमदनगरला पाणी देण्यावरून यापूर्वी येथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही विरोध दर्शविला होता. नाशिकसाठी पाणी पुरेसे नसताना मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी टॅँकर वा रेल्वेने देण्याची भूमिकाही स्थानिक आमदारांनी घेतली होती. मात्र, ते शक्य नसल्याने तसेच मराठवाड्यातून पाण्याची मागणी होत असल्याने वाद निर्माण झाला होता. स्थानिक स्तरावर त्यात निर्णय होण्याची शक्यताही नसल्याने अखेर हा प्रश्न मंत्रिमंडळ स्तरावर सोडण्यात आला. दरम्यान, पाण्याचा एवढा साठा सोडण्यासाठी साधारणत: सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. मुख्यत: दारणा धरण समूहाच्या दारणा आणि मुकणे धरणातूनच पाणी सोडले जाईल.


कृती समितीला डावलले
जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करत मनसेचे आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी सर्वपक्षीय आमदार आणि नेत्यांची जिल्हा कृती समिती तयार केली होती. त्यामार्फत पिण्याचे पाणी इतर योजनांद्वारे सोडण्याची मागणी केली होती. पण, त्यांचा विरोध डावलून मराठवाड्याची तृष्णा भागविण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.


पाणीचोरी रोखणार
पाणी सोडल्यानंतर नदीकाठावरील शेतीचा वीजपुरवठा बंद केला जाईल. पाणीचोरी रोखण्यासाठी पोलिस आणि अधिकार्‍यांची नेमणूक केली जाईल. अ. ना. म्हस्के, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग