आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: कर्जमाफीचा जिल्ह्यातील पहिला टप्पा 3.70 काेटींचा, 873 शेतक-यांना फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेंतर्गत अपडेट झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या ग्रीन याद्या ‘अापले सरकार’ या पाेर्टलवर अपलाेड झाल्या अाहेत. पहिल्या टप्प्यातील या कर्जमाफीकरिता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८७९ शेतकरी कर्जदारांची नावे या यादीत अाहेत. या खात्यांच्या कर्जमाफीकरीता स्वतंत्र बँक खात्यावर 3 काेटी ७० लाख रुपये जमा झालेले असले तरी अाता तालुकास्तरावर गठित करण्यात अालेल्या समित्यांकडून त्या तालुक्यातील लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात येईल त्यानंतरच या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ही रक्कम जमा हाेऊ शकणार अाहे,अजून किमान अाठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण हाेणार अाहे.
 
राष्ट्रीयीकृत बँकांची मुख्यालये मुंबई, पुण्यात असल्याने जिल्हानिहाय िकती शेतकरी पात्र अाहेत अाणि त्यांना दिली जाणारी कर्जमाफीची रक्कम किती याची माहिती त्यांच्याकडे त्या कार्यालयांकडेच अजून अाहे. त्यामुळे नेमका जिल्ह्यात नेमक्या किती शेतकऱ्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात झालेला अाहे, याची माहिती संबंधित यंत्रणांकडेही अद्याप नसल्याचे समाेर अाले अाहे. दुसरीकडे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ८७९ शेतकरी पहिल्या टप्प्यातील ग्रीन याद्यांवर नजर टाकता पात्र ठरलेले असले तरी अजून त्यांना तालुकास्तर समितीचा अडथळा पात्रतेसाठी पार करावा लागणार अाहे. चुकीचे लाभही काेणाच्या पदरात पडू देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात अाले अाहे. त्यानुसारच अाता अंतिम टप्पा म्हणून तहसीलदार, तालुका उपनिबंधक यांचा समावेश असलेल्या तालुकास्तर समितीच्या बैठकांतून याेजनेतील अपात्रतेचे निकष धारण करीत असलेल्या शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळली जातील अाणि पात्र लाभार्थ्यांची यादी नक्की केली जाईल या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमाफीची अालेली रक्कम वळती केली जाईल. यानंतर या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी मिळू शकणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...