आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी परीक्षेत नाशिकच्या 9 जणांचे यश; धीरज १७ वा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) २०१४ च्या परीक्षेत नाशिकच्या नऊ जणांनी यश मिळविले. सध्या सहायक विक्रीकर आयुक्त असलेले धीरज राजेंद्र सोनजे हे राज्यात १७ वे आले असून त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. पौर्णिमा तावरे यांची पोलिस उपअधीक्षकपदी तर प्रतिभा चौधरी, स्वप्नाली काळे, कल्पेश पाटील, आकाश किसवे, श्वेता भोसले, आमोल पाटील, अनिल नाडेकर यांची नायब तहसिलदारपदी निवड झाली.
धीरज हे गोविंदनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी व्हीजेटीआयमधून बी.टेक. केले. त्यानंतर एक वर्ष भारत पेट्राेलियम काॅर्पाेरेशन लिमिटेडमध्ये नाेकरी केली. गेल्या वर्षी विक्रीकर विभागात सहायक आयुक्त म्हणून िनवड झाली.