आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील नव्वद टक्के एटीएम बंदच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाेव्हेंबर महिन्यात देशात पुकारण्यात अालेल्या नाेटबंदीच्या झळा अाज पाच महिने उलटल्यानंतरही कमी व्हायचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समाेर अाले अाहे. एका बाजूला बंॅकात चलन तुटवडा तर दुसरीकडे एटीएम काेरडेठाक असल्याने ग्राहकांचे हाल हाेत अाहेत. अनेकांना शहरातील विविध भागातील एटीएम फिरुनही हाती पैसे पडत नाहीत, अशी स्थिती अाहे. शहरातील नव्वद टक्के एटीएम बंद असतांनाच अाजचा शनिवार अाणि उद्याचा रविवार सलग जाेडून दाेन दिवस बँकांना सुटी अाल्याने, त्यातच ‘कॅशलेस’एटीएम पहायला मिळत असल्याने शहरवासियांचे अधिक हाल हाेणार अाहेत. नाेटबंदीनंतर अचानक
 
‘कॅशलेस’अर्थव्यवस्थेचा केंद्र सरकारने पुरस्कार करीत गावागावात त्याबाबत जनजागृती सुरू केली अाहे. मात्र शेवटच्या घटकाने ही व्यवस्था स्विकारण्याअाधीच बँकांनी एटीएममधून रक्कम काढण्यास काही व्यवहारांनंतर तसेच अाॅनलाइन व्यवहारांवरही वेगवेगळे वाढीव कर अाकारायला सुरुवात केली अाहे. यामुळे हाती मुबलक पैसा कमीत कमी व्यवहारांतून 
रहावा यासाठी सामान्य माणूस बंॅकेतील वेतनाची रक्कम काढून घेत अाहे. त्यातच नाेटबंदीमुळे बँकांमध्ये माेठ्या प्रमाणात ठेवी अाल्याने बँकांनी मुदत ठेवींचे व्याजदरही ७.५ टक्क्यांपर्यंत अाणले अाहेत, यामुळे बंॅक ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळेल अशा पर्यायांकडे सामान्य माणूस वळायला लागला अाहे. यामुळे बंॅकांतून पैसे काढण्याचा अाेघ जास्त अाणि ठेवी कमी, अशी नवी स्थिती निर्माण हाेते की काय? अशी परिस्थिती पहायला मिळत अाहे. दुसरीकडे कडे जिल्ह्यातील बँकांना रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमधून पुरेसे चलन उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे बँकांत नाेटांचा तुटवडा निर्माण झाला असून याचा परीणाम सर्वच राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँकांच्या एटीएममध्ये रक्कम भरण्यावर झाला. यामुळे एटीएममध्ये गेल्या काही दिवसांपासून खडखडाट पहायला मिळताे अाहे. ही स्थिती साेमवारी बँकांना चलन उपलब्ध झाले नाही तर अजून बिकट हाेण्याची शक्यता आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...