आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या हेल्पलाइनवर 919 तक्रारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज ठाकरे यांनी शहरातील समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या ‘हेल्पलाइन’कडे लक्ष देण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या 20 दिवसांत तब्बल 919 तक्रारी त्यावर आल्या. या तक्रारींचा आढावा घेऊन प्रत्येकाशी संपर्क साधून तक्रारीचे निराकरण झाले की नाही, यावर आता स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले यांचे लक्ष असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेला जबरदस्त फटका बसल्यानंतर खुद्द ठाकरे यांनीच नाशिककडे लक्ष केंद्रित केले होते. नगरसेवकांनी कामे केली मात्र त्याचे मार्केटिंग करता आले नाही, असे सांगत त्यांनी पालिकेतील कारभा-यांपासून तर संघटनेतील पदाधिका-यांना सुनावले होते. मोठी कामे तर सोडा मात्र, नागरी समस्या सोडवण्यासाठी पालिकेची हेल्पलाइन अद्यावत करा, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार ढिकले यांनी 15 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीतील समस्यांचा अहवाल मागवला आहे. त्यात 919 समस्यांविषयी तक्रारी आल्या असून, त्यात 600 तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा पालिकेने केला आहे. 300 तक्रारींचे निराकरण प्रगतिपथावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मनसेसाठी वातावरणनिर्मिती
गेल्या अडीच वर्षांत मनसेला मूलभूत सुविधा देण्यात अपयश आल्याची टीका झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेने ढिकले यांच्या दौ-यातून वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न केल्याचेही लपून राहिले नाही.
सकाळी दोन तास देणार हेल्पलाइन पाहणीसाठी...
येत्या आठवडाभरात सकाळचे दोन तास पूर्णत: नाशिकसाठी दिले जाणार असल्याचे ढिकले यांनी सांगितले. प्रभागात अचानक दौरे करून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. त्या समस्या सुटल्या की नाही याचाही आढावा घेतला जाणार आहे.