आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदातीरी 1 मे पासून ज्ञानयज्ञ, यंदाचे ९४ वे वर्ष, महिनाभर विविध विषयांवर तज्ज्ञ मांडणार विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ शुक्रवार, दि. 1 मेपासून होणार आहे. वसंत व्याख्यानमालाचे यंदाचे ९४ वे वर्ष असून, व्याख्यानमालेचे उद््घाटनाचे पुष्प स्वाध्याय परिवाराच्या मार्गदर्शिका तथा प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या सुकन्या दीदी धनश्री तळवलकर गुंफणार आहेत.
वसंत व्याख्यानमालेचे उद््घाटन महापौर अशोक मुर्तडक मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.गोदातीरी यशवंतराव महाराज पटांगणावर संपूर्ण महिनाभर दररोज सायंकाळी वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेत सदानंद मोरे, रोणू मुजूमदार, दीपक घैसास, महेश गिरी, उषा दीदी, विनोद दुआ यांच्यासह नावाजलेले वक्ते राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक, वैज्ञानिक, कृषी, कुंभमेळा इत्यादी विषयांवर व्याख्यान देणार आहेत. या निमित्ताने श्राेत्यांना विविध विषयांचा माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याची माहिती वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.व्याख्यान मालेच्या समारोपप्रसंगी व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध व्यक्ती संस्थांचा सत्कार करण्यात येणार अाहे.

परिसंवादही रंगणार

२२मे रोजी महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी कुशवाह, पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त जगन्नाथन, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांचा परिसंवाद रंगणार आहे.

यंदाही यूट्यूबवर व्याख्यान

वसंत व्याख्यानमालेत अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेचा सर्वांना लाभ घेता यावा, यासाठी व्याख्याने यूट्यूबवरही टाकण्यात येणार आहेत.
संस्थेच्या वास्तूचे उद‌्घाटन

सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या वसंत व्याख्यानमाला या संस्थेच्या समतानगर, मुंबई नाका येथील वास्तूचे उद‌्घाटन मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.