आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक वनक्षेत्रात दाेन वर्षांत ९५ बिबट्यांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जंगल संपदा कमी हाेत असल्यामुळे भुकेने व्याकूळ झालेल्या प्राण्यांचा अाेढा शहराकडे वाढला अाहे. अन्नाच्या शाेधात येताना अपघात हाेणे, विहिरीत पडणे, पाण्याच्या अभावामुळे गेल्या दाेन वर्षांत नाशिक अाणि नगर वनविभागात तब्बल ३०८ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे अाली अाहे. त्यात प्राण्यांचा मृत्यू उपासमारीने झाल्याचे वनविभागाचा अहवाल सांगताे. गंभीर बाब म्हणजे दाेन वर्षांच्या काळात सर्वाधिक मृत्यू हाेण्याचे प्रमाण बिबट्यांचे असून, दाेन्ही जिल्ह्यांतील वनक्षेत्रात ९५ बिबट्यांचा मृत्यू झाला अाहे. 
 
मानवी वस्तीत बिबट्यासह अन्य वन्यजीवांचे प्रवेश करण्याचे प्रकार वाढले आहेत. वनक्षेत्रातील असंख्य अडचणींमुळे वन्यप्राणी अापला रहिवास बदलत असल्याचे दिसते. त्यामुळे अाता जंगलात वन्यप्राणी सहजासहजी दिसणे मुश्कील झाले अाहे. निसर्गरम्य परिसराची भुरळ पडल्याने फार्म हाउसच्या नावाखाली वनक्षेत्राजवळ चराऊ जमिनी आणि कड्याकपाऱ्यांवर वस्त्या वाढू लागल्या. जमीन सपाटीकरणासाठी जेसीबींची घरघर वाढली. रस्त्यांच्या सोयीमुळे वाहनांचे ताफेच्या ताफे “विक एण्ड’च्या निमित्ताने या भागात घिरट्या घालू लागले. विरळ जंगल आणि विशेषत: डोंगर कपाऱ्या या वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने त्याने वैयक्तिक सुरक्षा अन्नाच्या शोधात जवळच्या नागरी वस्त्यांना आपले लक्ष केले. स्थलांतराच्या नादात वन्यजीवांचा अपघात हाेऊन मृत्यू हाेत असल्याची बाब पुढे अाली अाहे. २०१५-२०१६ अाणि २०१६-२०१७ या दाेन वर्षांच्या काळात ८९ वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाले अाहेत. ४१ वन्यजीवांचा विहिरीत पडून जीव गमवावा लागला असून वय हाेणे, उष्माघात या कारणांमुळे १५९ प्राण्यांचा मृत्यू झाला अाहे. प्राण्यांमध्ये सर्वाधिक ९५ बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. त्यात विशेषत: विहिरीत पडून, रस्त्यावर वाहनाची धडक लागून, विजेचा शाॅक लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक अाहे. त्याखालाेखाल हरीण, काळवीट, तरस, कोल्हा, माकड, चिंकारा, मोर, लांडगा यांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. 

बिबट्याचा रहिवास अाता शेतात 
बिबट्याची सर्वाधिक संख्या पाण्याची उपलब्धता अाणि उसाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड अाणि सिन्नर तालुक्यात सर्वाधिक अाढळून येते. या शिवाय नगरमध्ये अकाेला, संगमनेर, काेपरगाव, राहुरी अाणि पारनेर या भागात बिबट्या अाढळून अाल्याचे वनविभागाचा अहवाल सांगताे. उसाच्या शेतात सहजपणे लपता येत असल्याने याच शेताला अधिवासासाठी सध्या बिबट्या पसंती देत अाहे. उस कापणीच्या वेळी अनेकदा शेतात बिबट्याचे पिले अाढळल्याच्या घटना नाशिक अाणि नगर जिल्ह्यात घडल्या अाहेत. उसाच्या क्षेत्रामुळे नाशिक अाणि नगर या दाेन्ही जिल्ह्यात सर्वाधिक बिबटे फिरत असतात असे वनविभागाचे म्हणणे अाहे. माणसाचा वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रातील अती हस्तक्षेप वेळीच थांबल्यास येत्या काही वर्षांत बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष अाणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...