आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाज फैसला, अायमा सभासदांची पसंती तलवार की चव्हाणांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (अायमा) च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगळवारी माेठ्या उत्साहात मतदान झाले. १५३० उद्याेजक मतदार असलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी सत्ताधारी गटाकडून वरुण तलवार अाणि विराेधात तुषार चव्हाण यांच्यात सरळसरळ लढत झाली. दाेन्ही उमेदवारांच्या समर्थकांचा त्यांच्या बूथपासून मतदान केंद्रापर्यंत सकाळपासूनच अाेसंडून वाहणारा उत्साह, मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर दाेन्ही उमेदवारांकडून मतदारांना केले जाणारे अावाहन असे चित्र अायमा रिक्रिएशन सेंटरच्या अावारात पहायला मिळत हाेते. दिवसभरात १०४० मतदारांनी अापला मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण ६८ टक्के अाहे. 


यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, तुषार चव्हाण गटाकडून केवळ अध्यक्षपदासाठीचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अाल्याने एकूण २६ पैकी २५ जागा सत्ताधारी गटाने अविराेध जिंकल्या अाहेत. तर चव्हाण यांनीही अापली मागणी २०१२ पासून दाेन्ही उमेदवारांच्या बूथसमाेर दिवसभर अशी गर्दी पहायला मिळाली. 


अध्यक्षपदाचीच असल्याने एकमेव पदासाठी अर्ज दाखल केल्याचे सांगितले हाेते तर दाराेदार फिरून त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या हाेत्या. सत्ताधारी गटाचे उमेदवार वरुण तलवार यांच्याकडूनही जाेरदार प्रचार यंत्रणा राबविली गेली. उद्याेजक मतदार असल्याने व्यक्तिश: भेटीगाठींसह साेशल मीडियावर जाेरदार कॅम्पेनही त्यांनी केले. त्यांच्यासाेबत अविराेध निवडून अालेली २५ जणांची टीम तर हाेतीच, शिवाय माजी अध्यक्षांची एक फळीही पूर्णवेळ प्रचारात कार्यरत हाेती, याचमुळे या निवडणुकीला अायमाच्या सदस्यांच्या दृष्टीने यंदा विशेष महत्त्व हाेते. मंगळवारी सकाळी मतदारांत दिसणारा उत्साह दुपारच्या भर उन्हातही कायम पहायला मिळाला. महिला तसेच पुरुष मतदारांनी माेठी गर्दी केल्याचे चित्र याचमुळे पहायला मिळाले. 


यांची प्रतिष्ठा पणाला : दाेन्ही उमेदवारांसह त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्यांचीही प्र्रतिष्ठा पणाला लागली अाहे. यात वरुण तलवार यांच्याकरिता माजी अध्यक्ष धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गाेपाळे, सुरेश माळी, विवेक पाटील, संदीप साेनार यांच्यासह निमाचे माजी अध्यक्ष मनीष काेठारी, विद्यमान अध्यक्ष मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संताेष मंडलेचा यांची तर तुषार चव्हाण यांच्याकरिता नगरसेवक शशिकांत जाधव अाणि नगरसेविका हेमलता पाटील यांच्यासह लघुउद्याेग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन हे दिवसभर तळ ठाेकून हाेते. 


अाज मतमाेजणी, उद्या अधिकृत घाेषणा 
बुधवारी (दि. ३०) सकाळी नऊ वाजेपासून मतमाेजणीला सुरुवात हाेणार असून, दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती लागण्याची शक्यता अाहे. निवडणूक निर्णय अधिकारी डी. जी. जाेशी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एकूण मतपत्रिकांतून तुषार चव्हाण, वरुण तलवार यांना मते पडलेल्या तसेच बाद असलेल्या मतपत्रिका वेगवेगळ्या केल्या जातील, त्यानंतर २५-२५ मतपत्रिकांचे गठ्ठे केले जातील. यानंतर मतमाेजणीचे अाकडे जाहीर केले जातील. 

बातम्या आणखी आहेत...