आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्केच खरीप कर्जवाटप; कर्जमाफी याेजनेला विलंबाचा फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सुरुवातीला नाेटाबंदीमुळे अडकलेली काेट्यवधी रुपयांची उलाढाल, कर्जमाफीबद्दल सरकारने दीर्घकाळ साधलेली चुप्पीची भूमिकेमुळे कर्ज फेडण्याची क्षमता असतानाही अनेक शेतकऱ्यांनी न केलेली कर्जफेड यामुळे अडचणीत अालेली जिल्हा मध्यवर्ती बँक यामुळे २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ च्या खरीप हंगामात केवळ २० टक्के कर्ज वितरण हाेऊ शकले. नाशिक जिल्हा बँकेने यापूर्वी पीककर्जाचे अाशिया खंडातील विक्रमी कर्जवितरण करणारी बँक अशी कमावलेली अाेळखदेखील या वर्षात गमावली. २०१६-१७ मध्ये केलेल्या १७१९ काेटी रुपयांच्या कर्ज वितरणाच्या तुलनेत अवघे २० टक्के कर्ज वितरण बँक यंदा खरिपासाठी करू शकली. 


देशातील कृषी विकासात अग्रेसर जिल्हा म्हणून नाशिकचा लाैकिक अाहे. त्यामुळे येथील कृषी पतअाराखडाही माेठा असताे. मात्र सन २०१६-१७ पर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू असले तरी २०१७-१८ मध्ये सर्वच बँकांकडून खरिपाच्या पीककर्ज वाटपात हात अाखडता घेतला गेल्याचे स्पष्ट झाले अाहे. जिल्हा बँक अनावश्यकरित्या अडचणीत अाल्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीककर्जावरही झाल्याचे पहायला मिळाले. पीककर्ज वितरणात सर्वात माेठा वाटा असलेल्या जिल्हा बँकेचे जवळपास ३४१ काेटी नाेटाबंदीमुळे प्रत्यक्षरित्या तिजाेरीत अडकले. तितकीच रक्कम बँकेने नव्या नाेटांच्या रूपाने ग्राहकांना बदलून दिली. यामुळे जवळपास ६७५ काेटी रुपयांचे व्यवहार अडचणीत अाले. त्यानंतर एेन कर्ज परतफेडीच्या कालावधीत सरकारच्या विराेधात विराेधीपक्ष कर्जमाफीकरीता राज्यभर रस्त्यावर उतरला. यामुळे कर्जमाफी हाेणार असल्याची अाशा ठेवत हजाराे शेतकऱ्यांनी परतफेड केली नाही. 


यात गरजू शेतकऱ्यांबराेबर जे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत हाेते, अशाही शेतकऱ्यांचा समावेश असल्याने नाशिक जिल्हा मध्यव र्ती सहकारी बँक अाणखी अडचणीत अाली. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकाही कर्ज देतात. मात्र, त्यांचे प्रमाण तुलनेने अल्प असून केवळ जिल्हा बँक अडचणीत अाल्याने यंदा खरिपाचे कर्ज वितरण ८० टक्क्यांनी घटले अाहे. 


२५० काेटींचेच वितरण 
३१ मार्चपर्यंत कर्जफेड करणाऱ्यांना नव्याने कर्ज देण्याची शाश्वती दिली गेली. मात्र, प्रत्यक्षात अशा शेतकऱ्यांनाही कर्जाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे बँकेवर शेतकऱ्यांचे माेर्चे निघाल्याचेेही पाहायला मिळाले. एकूणच सर्वाधिक पीककर्जाचे वितरण करणाऱ्या व शेतकऱ्यांची थेट नाळ जुळलेल्या जिल्हा बँकेला केवळ २५० काेटींचेच खरीप कर्ज वितरण करता अाले. 

बातम्या आणखी आहेत...