आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे यांची एसीबीकडून पुन्हा दोन तास चाैकशी, खडसे यांच्याकडून इन्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एमअायडीसीच्या भूखंडासह भ्रष्टाचाराच्या विविध अाराेपांमुळे मंत्रिपद साेडावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मंगळवारी पुन्हा नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात २ तास चाैकशी झाली. याबाबत पाेलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी गाेपनीयतेच्या नावाखाली माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला.


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्याविराेधात विविध भ्रष्टाचाराचे अाराेप केले हाेते. यात, नाशकातही दाेन ते तीन फ्लॅट व भूखंड असल्याची तक्रार एसीबीच्या महासंचालकांकडे केली हाेती. त्याची दखल घेत नाशिकच्या एसीबीकडे खडसेंच्या मालमत्तेच्या चाैकशीचे अादेश दिले हाेते.

 

खडसे यांच्याकडून इन्कार
खडसे म्हणाले, ‘नाशिकच्या एसीबीची चाैकशी तीन महिन्यांपूर्वीच संपली अाहे. अाता नव्याने चाैकशी नाही. पण मी तीन वेळा चारचाकी वाहने घेतली. त्यासाठी काेणत्या बँकेचे कर्ज घेतले, कसे फेडले, याची विचारणा एसीबीने केली हाेती. त्याची कागदपत्रे देण्यासाठी कार्यालयात गेलाे हाेताे.’

बातम्या आणखी आहेत...