आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळागोंधळ: कृषी अभ्यासक्रमात तिसऱ्या वर्षी घेतली पहिल्या वर्षाची परीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पदविकेनंतर पदवी करण्यासाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्याचा नियम अचानकपणे बदलल्याने कृषी महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थ्यांना चक्क तिसऱ्या वर्षात पहिल्या वर्षाची परीक्षा द्यावी लागली अाहे. त्यातच अंतिम वर्षाचा निकाल जाहीर हाेण्याची वेळ झाली तरीही पहिल्या वर्षाचा निकाल अद्याप लागलेला नसल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले अाहेत. हा निकाल वेळेत न लागल्यास पदव्युत्तर शिक्षणापासून एक वर्ष वंचित राहण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त हाेत अाहे. 


कृषी अभ्यासक्रमाच्या पदवीला अनेकांचा नंबर लागला अाहे. त्यामुळे हे विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यांमधून नाशिकमध्ये शिक्षणासाठी अाले अाहेत. कुटुंबीयांपासून दूर राहताना येणारा मानसिक ताण, राहण्याचा खर्च अाणि तत्सम बाबींमुळे संबंधित विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामाेरे जावे लागते. परंतु, अाता निकालातील गाेंधळामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता अधिकच खालावत अाहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घ्यायचे असेल तर पहिल्या वर्षाची सूट मिळत हाेती. थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचत हाेेते. परंतु, गेल्या वर्षी अचानक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निर्णय बदलत पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलेली एक वर्षाची सूट रद्द केली. विशेष म्हणजे तिसऱ्या वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाची परीक्षा द्यावी लागली. ही परीक्षा हाेऊन सात ते अाठ महिने उलटले, मात्र अद्यापही निकाल हाती लागलेला नाही. या विद्यार्थ्यांचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण हाेण्याची वेळ अाली अाहे. पहिल्या सेमिस्टरचा निकाल अद्याप हाती नसल्याने त्याचा परिणाम पदवी निकाल लांबणीवर हाेणार अाहे. निकालानंतर लगेचच पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू हाेते. पदवीचा निकाल ताेपर्यंत न लागल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमाला या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. 


निकाल ताेंडी सांगितला; त्यातही गाेंधळच 
पहिल्या वर्षाची गणित, भाषा अाणि शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा घेतल्यानंतर या परीक्षेचे निकाल विद्यार्थ्यांना चक्क ताेंडी सांगण्यात अाले हाेते. त्यातही एका विद्यार्थ्याला गणितात उत्तीर्ण असल्याचे सांगण्यात अाले. मात्र, वर्षभराने त्याचे नाव गणिताच्या परीक्षार्थींच्या यादीत अाले. ही बाब संबंधित विद्यार्थ्याला परीक्षा झाल्यानंतर महिन्यानंतर कळली. त्यामुळे त्याचे वर्ष वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत अाहे. विद्यापीठाच्या चुकांमुळे अशाप्रकारे विद्यार्थी नाहक भरडला जात असल्याची भावना व्यक्त केली जात अाहे. 


माझे वर्ष वाया जाण्याची भीती 
 मी गणिताच्या परीक्षेत उत्तीर्ण असल्याचे सरांनी ताेंडी सांगितले हाेते. परंतु, याच पेपरच्या परीक्षार्थींच्या यादीतही माझे नाव हाेते. ही बाब उशिरा कळल्याने परीक्षा देता अाली नाही. अाता माझे वर्ष वाया जाऊ शकते. मी काॅलेजकडे खूप पाठपुरावा केला. विद्यापीठही मला दाद देत नाही. 
- जयेश वाळुंज, विद्यार्थी, मविप्र कृषी महाविद्यालय 

बातम्या आणखी आहेत...