आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेपर्ड सफारीबाबत वनमंत्र्यांचे अाश्वासन; गाळणे येथे प्रकल्प सुरू करण्याची हाेती मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- मालेगावसह जवळच्या तालुक्यातील बिबट्यांची संख्या लक्षात लक्षात घेता या वन्यप्राण्यांचे पुनर्वसन करण्याबराेबरच शेतकऱ्यांना त्यापासून सुरक्षित करण्यासाठी तसेच वन पर्यटन विकसित करण्याकरिता गाळणे येथील जंगलात लेपर्ड सफारी (बिबट्या वन प्रकल्प) प्रकल्प साकारण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अाहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली. 


मालेगाव व चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत माेठ्या प्रमाणात बिबटे अाढळून अाले अाहेत. िबबट्यांनी जनावरे व माणसांवरदेखील प्राणघातक हल्ले केले अाहेत. त्यामुळे या भागातील नरभक्षक बिबट्याला शार्पशूटरकडून गाेळ्या घालण्यात अाल्या अाहेत. अन्न-पाण्यासाठी बिबटे मानवी वस्तीकडे येत अाहेत. परिणामी शेतकरी व पशुधनदेखील धाेक्यात अाहे. याची दखल घेत बिबट्यांना वनविभागातच साेय करण्याबराेबरच जनावरांना दूर ठेवण्यासाठी लेपर्ड सफारीचा पर्याय अॅड. शिशिर हिरे, अॅड. सतीश पवार, नाना मराठे, अशाेक चाेपडा यांनी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्याकडे दिला हाेता. जाधव यांनी माहिती घेऊन वनमंत्री मुनगंटीवार यांची नाशिक दाैऱ्यात भेट घेतली. तालुक्यात लेपर्ड सफारीसाठी अावश्यक जमीन व वन पर्यटनाला पूरक स्थिती त्यांच्या निदर्शनास अाणून दिली. 

बातम्या आणखी आहेत...