आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ समर्थक काढणार विधिमंडळ अधिवेशनावर माेर्चा; राष्ट्रवादी, भाजप-सेनेचे अामदार हाेणार सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जवळपास दाेन वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी मार्च महिन्यात हाेणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर विराट माेर्चा काढण्याचा निर्णय भुजबळ समर्थकांनी घेत सत्ताधारी भाजपला काेंडीत पकडण्याची रणनीती अाखली अाहे. केवळ भुजबळ समर्थक या झेंड्याखाली सर्वपक्षीयांना एकत्र अाणण्याचा निर्धार व्यक्त करीत याप्रसंगी उपस्थित भाजप अामदार अपूर्व हिरे, शिवसेना अामदार अनिल कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे अामदार जयवंत जाधव व नरहरी झिरवाळ यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अांदाेलनाचा इशारा दिला अाहे. 


भुजबळांवरील अन्यायकारक कारवाईबाबत अधिवेशनात चर्चा घडवून अाणू, असे अाव्हान भाजपला देत हिरे यांनी घरचा अाहेरही दिला. मार्च २०१६ पासून महाराष्ट्र सदन व अन्य घाेटाळ्याच्या अाराेपाखाली भुजबळ व त्यांचे पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ हे तुरुंगात अाहे. यापूर्वी अाॅक्टाेबर २०१६ मध्ये भुजबळ समर्थक या झेंड्याखाली नाशिकमध्ये विराट माेर्चा काढण्यात अाला हाेता. त्यावेळी भुजबळ यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचा डाव भाजपचा असल्याचे अाराेप झाले हाेते. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये म्हणजेच वर्षभरानंतर भुजबळ यांचा जामीन फेटाळल्यावर पुन्हा समर्थकांनी अाक्रमक पवित्रा घेत २ जानेवारी राेजी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय व तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमाेर गांधीगिरी पद्धतीने अांदाेलन केले हाेते. 


भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत उद्रेक वाढत असल्याचे बघून अाता थेट राज्याच्या राजधानीत धडक देण्याचे नियाेजन करण्यात अाले. शनिवारी जयशंकर लाॅन्स येथे भुजबळ समर्थकांच्या बैठकीत मार्च महिन्यात अधिवेशनादरम्यान मुंबईत धडकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात अाला. 


राणीची बाग येथून माेर्चाला सुरुवात करून अाझाद मैदानात समाराेप हाेईल. त्याची तारीख मात्र लवकरच निश्चित हाेणार अाहे. देशपातळीपर्यत 'भुजबळ समर्थक जोडो अभियान' राबविण्यात येणार असून भुजबळ समर्थक समन्वय समित्या गठित गेल्या जाणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...