आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Breaking: नाशिकमध्ये ट्रक मिनीट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 10 जण ठार, तर 13 जण जखमी Breaking: Truck And Mini Bus Accident In Nasik Latest News And Updates

NASHIK: टायर फुटल्याने मिनीबसची उभ्या ट्रकला धडक,10 ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात मिनीबसचा अक्षरश: चुराडा झाला. - Divya Marathi
अपघातात मिनीबसचा अक्षरश: चुराडा झाला.

चांदवड (जि. नाशिक)-  मध्य प्रदेशातील उज्जैन येथून देवदर्शन करून कल्याणकडे परतणाऱ्या भाविकांची मिनीबस टायर फुटून नादुरुस्त ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात १० जण जागीच ठार, १४ जण जखमी झाले. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या सोनग्रसजवळ गुरुवारी पहाटे पावणेसहा वाजता घडला. दरम्यान, मृतांत एका बालकासह ७ महिला व २ पुरुषांचा तर जखमींमध्ये  एका बालकासह ७ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण हे कल्याण येथील रहिवासी होते. जखमींवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.  


जागृती प्रकाश घावरी (३५), गुंजन अजय वालोदरा (२८), गीता नरशी परमार (४५), पवन प्रकाश घावरी (७), लक्ष्मीबाई नानजी परमार (६५), किसन बाबा चव्हाण (५८), प्रकाश सना घावरी (३५), काऊ छगन चव्हाण (४८), गीता मोहन परमार (४०), निशा प्रकाश घावरी (१६ सर्व रा. कल्याण) अशी मृतांची नावे आहेत, तर १४ जण जखमी झाले आहेत. कल्याण येथील साई ट्रॅव्हल्सच्या मिनी बसचे चालक संतोष किसन पिठले हे २२  प्रवाशांना घेऊन मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर, महाकालेश्वर, उज्जैन येथे देवदर्शनासाठी घेऊन गेले होते. देवदर्शन करून सर्वजण उज्जैन येथून बुधवारी रात्री परतीच्या प्रवासाला निघाले होते. आडगाव टप्पा फाट्याजवळ नादुरुस्त ट्रक रस्त्याशेजारी उभा होता. त्याचवेळी मुंबईकडे येणाऱ्या ट्रॅव्हलरचे पुढील टायर फुटले. यामुळे चालकाचा ताबा सुटून बस पाठीमागून ट्रकवर धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की बसच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. यात १० जण जागीच ठार झाले, तर १४ जण गंभीर जखमी झाले. 

 

हेही वाचा...PHOTOS: नाशिकजवळ भाविकांच्या मिनी ट्रॅव्हलरवर काळाचा घाला..10 जागीच ठार; 11 जखमी

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोग्रसनजीक मुंबई-आग्रा महामार्गावर वाळूच्या ट्रकचे टायर पंक्चर झाल्यामुळे ट्रक (एमएच15-सीके 8422) हा रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी सकाळी 6 वाजेच्या सुमारास भरधाव वेगात मध्य प्रदेशातील उज्जैन येथून देवदर्शन करुन कल्याणकडे परतणार्‍या भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच 05-आर 0357)  उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघातात 10 जण जागीच ठार तर 11 जण जखमी झाले. चांदवड येथील सोमा टोलवेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृत व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...