आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- 'घर फिरले की घराचे वासेही फिरतात' अशी म्हण अापल्याकडे बऱ्याचदा वापरली जाते, तसेच काहीसे चित्र जिल्हा बँकेतदेखील नाही ना? अशी चर्चा अाता सुरू झाली अाहे. कारणही तसेच अाहे, संचालक मंडळाच्या बरखास्तीला स्थगिती मिळाल्यानंतर बँकेेची सूत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर चेअरमन केदा अाहेर यांनी बँकेतील त्यांच्या दालनातील खुर्चीची दिशा बदलून टाकली अाहे. यामुळे पुन्हा एकदा बँकेेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधणाऱ्या अाहेर यांनी काेण्या वास्तुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने तर ही दिशा बदलली नाही ना? अशी चर्चा बँकेत पहायला मिळते अाहे.
परवेज काेकणी चेअरमन असताना बँकेने अाशिया खंडात सर्वाधिक पीककर्ज वितरित केल्याचे सांगितले जात हाेते, त्यांच्याकाळात ही अासनव्यवस्था पश्चिमाभिमुखच हाेती. मात्र, त्यानंतर नरेंद्र दराडे यांच्या काळात ही दिशा बदलली अाणि बँकेेची दशाही बदलली. गेल्या दीड वर्षात बँकेेमागे नाेटबंदी, त्यानंतरची कर्जमाफी असे एक ना अनेक शुक्लकाष्ट लागले. शिक्षक-शेतकऱ्यांचे माेर्चेदेखील बँकेने पहिल्यांदाच अनुभवले.
महावितरणने पाेलिसांत तक्रार दाखल केली अाणि सरतेशेवटी बँकेच्या संचालक मंडळावर कलम ८८ नुसार चाैकशीचे शुक्लकाष्ट अाणि बरखास्तीही अाली. याला कारण, दराडेंनी अध्यक्षांच्या खुर्चीची दिशा बदलविल्याचे तर नव्हते ना? असा प्रश्न अाज बँकेेत अध्यक्षांच्या कॅबिनला भेट देणाऱ्या काेणालाही सहज पडण्यासारखा अाहे. कारण, केदा अाहेर यांनी दुसऱ्यांदा चेअरमनपदाची सूत्रे स्वीकारताच, दराडे यांच्या काळातील पश्चिमाभिमुख अासनव्यवस्थेलाच पसंती दिली अाहे. काेण्या वास्तुतज्ज्ञाने तर त्यांना हा सल्ला दिला नाही ना? अशी चर्चा सुरू असून स्वत:ची दिशा बदलल्यानंतर अाता बँकेची दशा बदलण्यास अाहेर किती यशस्वी ठरतात हे पाहणे मात्र अाैत्सुक्याचे ठरणार अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.