आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगावजवळ अपघातात लष्करी जवानाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- डेहराडून येथे लष्करी सेवेत असलेेले गाैरव भैरवलाल करपे (२४) यांचे भरवस फाटा-कोळपेवाडीरोडवरील मानोरी फाट्याजवळ ट्रॅक्टर अाणि पल्सर माेटारसायकल अपघातानंतर रुग्णालयात नेत असताना निधन झाले. ते ३० दिवसांची सुटी घेऊन विंचूर येथे गावी आलेले होते. या अपघातात त्यांच्यासमवेत असलेला मित्र जुबेर याकूब शेख गंभीर जखमी झाला आहे. 


करपे अाणि शेख हे पल्सर माेटारसायकलवरून (एम.एच. १५ एफजे २९०८) जात असताना ट्रॅक्टरवर त्यांची गाडी अादळली. करपे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर करपे यांच्या पार्थिवावर अाज अंत्यसंस्कार हाेण्याची शक्यता वर्तविली जात अाहे. लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये या अपघाताची नाेंद करण्यात अाली अाहे. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...