आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवड; भाजपचा उमेदवार अाज सभागृहामध्येच ठरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काेण विराजमान हाेणार, याचे पत्ते भाजपकडून सभागृहातच उघडले जाणार असल्याचे अाता स्पष्ट झाले अाहे. माजी चेअरमन अॅड. माणिकराव काेकाटे अाणि परवेझ काेकणी यांच्यासह केदा अाहेर यांची नावे चर्चेत अाहेत. अाठ दिवसांपासून इच्छुकांकडून व्यूहरचना करण्यात येत अाहे. मुख्यमंत्र्यांनीही उमेदवार काेण असावा हे ठरविण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले अाहेत. मात्र, त्यांनी शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत अधिकृतपणे काेणाचेही नाव जाहीर नव्हते. प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर संख्याबळाचा अंंदाज घेत ते एेनवेळी ठरविले जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 

नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस हाेता. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेलेनागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तळ ठाेकून असलेले सर्वजण बुधवारी रात्री नाशिकमध्ये परतले हाेते त्यांनी अापापल्या पध्दतीने फिल्डींग लावली हाेती. एकूणच बंॅकेची सत्ता भाजपाच्याच ताब्यात रहावी, याकरीता हालचाली गतीमान झाल्या असल्या तरी अध्यक्षपदाचा उमेदवार काेण? हे शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत ठरलेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संबंधितांकडून फिल्डिंग लावली जात हाेती अाणि गैरव्यवहारांची चाैकशी सुरू असलेल्या बंॅकेच्या अाराेग्यासाठी हिताचा, पारदर्शी प्रशासन देऊ शकेल असा उमेदवार काेण? याकरीता वेगवेगळ्या स्तरावर चाचपणीही सुरू हाेती.


या सगळ्या मुद्द्यांबराेबरच बंॅकेत निवडीसाठी अावश्यक असलेले संख्याबळ गाठू शकेल, या मुद्द्यावरही लक्ष ठेवण्यात येत हाेते. त्यामुळे एेनवेळी सभागृहात काेणाची उमेदवारी जाहीर हाेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार अाहे.

 

..तर पुन्हा सत्ता दराडेंकडे
एकाबाजूला भाजपाकडून काेणाच्याही नावावर एकमत हाेत नसल्याने इच्छुकाचे नाव जाहीर झालेले नाही, तर दुसरीकडे चेअरमनपदाचा राजीनामा दिलेले नरेंद्र दराडे यांचे बंधू, शिवसेनेचे नेते किशाेर दराडे यांना चेअरमपदासाठी काही संचालकांकडून गळ घातली जात असून दराडेंकडूनही ती नाकारली गेलेली नसल्याची माहिती समाेर अाली अाहे. यामुळे पुन्हा एकदा मागील वेळीप्रमाणे थेट सभागृहातच समीकरण बदलून जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दराडेंकडे जाणार का? हे पहाणे महत्वाचे ठरणार अाहे.

 

अशी असेल प्रक्रिया
- सकाळी११ ते ११.३०- उपस्थित नवनिर्वाचित संचालकांच्या इतिवृत्तावर स्वाक्षऱ्या

- ११ ते ११.३०- नामनिर्देशनपत्र देणे स्वीकृती

- सकाळी १२.०५ ते १२.१५- नामनिर्देशन पत्र छाननी

- दुपारी १२.१६ ते १२.३०- उमेदवारी अर्ज माघार

- दुपारी १२.४५ ते १.१५- अावश्यकता भासल्यास मतदान

- मतमाेजणी-मतदान संपल्यावर लगेचच {निकाल -मतमाेजणी संपल्यानंतर लगेचच.

बातम्या आणखी आहेत...