आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम ७ जुलैला नाशकात, उद्याेजकांशी साधणार संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भाजपकडून अागामी लाेकसभा निवडणुका लक्षात घेता देशभरात राबविण्यात येत असलेल्या संपर्क अभियानाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम अाणि लाेकसभेतील विराेधी पक्षनेते तथा प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत केंद्राच्या फसलेल्या अार्थिक धाेरणांचा लेखाजाेखा मांडला जाणार अाहे. याअंतर्गत नाशिकमध्ये येत्या ७ जुलै राेजी चिदंबरम यांचे उद्याेजक, व्यापारी यांच्याशी संवादाचा कार्यक्रम अायाेजित करण्यात अाला अाहे. 


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणीने देशभरात फिरून संपर्क अभियान सुरू केले अाहे. या अभियानांतर्गत सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यात येत अाहे. भाजपच्या अभियानाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षानेही अभियान राबवित केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र माेदी सरकारच्या धाेरणांच्या निषेधार्थ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भेटणार अाहेत. या अभियानाला महाराष्ट्रात ठाणे येथून प्रारंभ झाला अाहे. याअंतर्गत येत्या ७ जुलै राेजी नाशकातील चाेपडा लाॅन्स येथे चिंदबरम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येणार अाहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण अाणि खासदार कुमार केतकर उपस्थित राहणार अाहेत. 


चिदंबरम यांच्याकडून केंद्रातील सरकारने जी नाेटबंदी केली, त्यापाठाेपाठ जीएसटीची अाकारणी केली. त्यामुळे देशभरातील अर्थव्यवस्था पूर्णपणे काेलमडली असल्याचे पुराव्यानिशी सादर केले जाणार अाहे. त्याचबराेबर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अाणि राष्ट्रीय सल्लागार यांनी दिलेल्या राजीनाम्यावरही ते भाष्य करणार अाहेत. तसेच शहरातील प्रमुख उद्याेजक, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीच्या भेटी घेऊन या सरकारचे अर्थविषयक धाेरण कसे फसवे ठरले अाहे, परराष्ट्रीय धाेरणातही निर्णय चुकीचे असल्याने त्याचाही अाढावा ते घेणार अाहेत. यासंदर्भात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे-पाटील, माजी अध्यक्ष अाकाश छाजेड, नगरसेवक राहुल दिवे, स्वप्नील पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियाेजन करण्यात अाले. 

बातम्या आणखी आहेत...