आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइगतपुरी- घोटी शहरातील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूसह ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली.
शहरातील महाराणा प्रताप चौकातील अश्विनी ज्ञानेश्वर भोर यांना गुरुकृपा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. डाॅक्टरांकडून सिझरचा सल्ला देण्यात आला. सिझर करण्यात आले. मात्र, नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार नवजात शिशूचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी आक्रोश केला. दरम्यान, फांगुळगाव येथील कविता भगवान दुभाषे ही ११ वर्षीय विद्यार्थिनीस पायास सूज आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात अाले होते.
परिस्थिती चांगली असताना तिला उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. सकाळी आठ वाजेदरम्यान दिलेल्या इंजेक्शनमुळे तिला भाेवळ अाली. याबाबत डॉक्टरांना सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. थाेड्याच वेळात रुग्णालयातच मुलीने प्राण सोडल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती काबूत आणण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडे घटनास्थळी तळ ठोकून होते. जमावाने डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा यासाठी मार्चा काढून पाेलिसांना निवेदन देत संताप व्यक्त केला. यावेळी माेठा जमाव जमा झाला हाेता. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी जमावास शांत राहण्याचे आवाहन केले.
संशयित डॉक्टरांना पोलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले असून, सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंदा माळी, विलास घिसाडी तपास करत आहे. याप्रसंगी परिस्थिती चिघळू नये म्हणून अण्णासाहेब पवार हवालदार शीतल गायकवाड, बिपीन जगताप, सुरेश सांगळे, प्रकाश कासार, लहू सानप, संतोष दोंदे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढल्याने तणाव निवळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.