आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात मायलेकाचा खून करणाऱ्या अाराेपीस फाशी; कॉल रेकॉर्डचा पुरावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विवाहितेने अनैतिक संबंधास नकार दिल्याने तिचा व तिच्या सहा वर्षांच्या बालकाचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात  न्यायालयाने अाराेपी रामदास रंगनाथ शिंदे यास गुुरुवारी फाशीची शिक्षा ठाेठावली. या खटल्यात स्फेक्ट्राेग्राफीचा पुरावा ग्राह्य धरण्यात आला असून, अशाप्रकारचा हा राज्यातील हा पहिलाच निकाल ठरला.   


सातपूरच्या कार्बननाका परिसरात कचरू संसारे हे पत्नी, तीन मुली व मुलगा विशालसोबत रंगनाथ शिंदे यांच्या घरात किरायाने रहात होते. उन्हाळी सुटी लागल्याने त्यांच्या तीनही मुली गावी गेल्या होत्या, तर कचरू हे कंपनीत रात्रपाळीवर गेले होते. १८ एप्रिल २०१६च्या मध्यरात्रीच्या शिंदे यांचा विवाहित मुलगा अाराेपी रामदास याने मागच्या दाराने संसारे यांच्या घरात प्रवेश केला. झाेपेत असलेल्या कचरु यांच्या पत्नी पल्लवी यांच्याकडे अनैतिक संबंधाची मागणी केली. त्यास पल्लवी हिने विरोध केला. त्यामुळे रामदास याने तिच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. ती अारडाअाेरड करताच बाजूलाच झाेपलेला मुलगा विशालही जागा झाला. रामदासने त्याच्याही अंगावर सपासप वार केल्याने दाेघेही रक्ताच्या थाराेळ्यात पडले.

 

तेव्हा त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावून रामदास फरार झाला हाेता. कचरु सकाळी कंपनीतून घरी अाले, मात्र घराला कुलूप पाहून त्यांनी शेजारी विचारपूस केली. मात्र, काेणालाच काही माहित नव्हते. त्यांनी खिडकीतून डाेकावून पाहिले असता पत्नी व मुलाचा मृतदेह त्यांना दिसला. दरम्यान, या प्रकरणी संशयावरुन  रामदास यास अटक करण्यात अाली.

 

कॉल रेकॉर्डचा पुरावा 
न्यायवैद्यक प्रयाेगशाळेतील तांत्रिक विश्लेषकांचा (स्पेक्ट्राेग्राफी) पुरावा महत्त्वाचा ठरला. अाराेपी रामदासने शेवटचा काॅल मित्र सुभाष राजपूतला केला हाेता.  साक्षीदाराने न्यायालयात अाराेपी व सुभाष यांचे फाेनवरील संभाषणातील अावाज या दाेघांचाच असल्याचे सिद्ध करुन दाखवले.  राजपूतने अाराेपी रामदासचा ताे काॅल सेव्ह करुन ठेवला हाेता. काॅल रेकार्ड नष्ट हाेऊ नये म्हणून अॅप्लिकेशनचा वापर करून त्याला पासवर्ड देऊन हाइड केले हाेते. या अावाजाची पडताळणी केल्याचा स्पेक्ट्राेग्राफीचा अहवाल न्यायालयाने ग्राह्य धरला.

बातम्या आणखी आहेत...