आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माॅडेल बनण्यासाठी मुलीने रचला अपहरणाचा बनाव, कुटुंबीयांकडेच मागितली 7 लाखांची खंडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लासला गेलेल्या मुलीचे अपहरण झाल्याचा फाेन येताच तिची अाई भेदरली... - Divya Marathi
क्लासला गेलेल्या मुलीचे अपहरण झाल्याचा फाेन येताच तिची अाई भेदरली...

नाशिक - मुंबईत जाऊन मॉडेलिंग करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीने दूरचित्रवाणीवरील एका गाजलेल्या गुन्हेगारी मालिकेतून कल्पना घेत मित्रांसमवेत स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि त्यांच्याकरवी अापल्याच कुटुंबीयांकडे चोरीच्या मोबाइलवरून संपर्क साधून सात लाख रुपयांची खंडणी मागितली. भेदरलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी सातपूर पाेलिस ठाण्यात धाव घेऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली. पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कुटुंबीयांनी दिलेल्या तोकड्या माहितीच्या आधारे सुमारे नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलीसह दोन संशयितांना बुधवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरात ताब्यात घेतले. याप्रकरणी सातपूर पोलिसांत अपहरणाचा बनाव व इंदिरानगर पोलिसांत मोबाइलचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी खास पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानुसार, सातपूर परिसरातील एका मध्यमवर्गीय कुटंुबातील मुलगी डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. तसेच, ती अशोकस्तंभावरील एका इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या क्लाससाठीही रोज सकाळी साडेसहा वाजता जाते. मंगळवारीही (दि. २०) ती सकाळी या क्लाससाठी गेली हाेती. मात्र, १० वाजेपर्यंत ती घरी न आल्याने तिच्या आईने क्लासमध्ये फोन करून चाैकशी केली असता ती सकाळी ९ वाजताच क्लासमधून गेल्याचे सांगण्यात आले. दुपारी चार वाजेपर्यंतही ती घरी परतली नाही. त्यामुळे घरची मंडळी काळजीत पडली.


तेवढ्यात पावणे पाच वाजेच्या सुमारास एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून मुलीच्या आईला फोन आला की 'मै बंबई वडालासे वसीम बाेल रहा हूँ, अापकाे अापकी लडकी चाहिए ताे सात लाख रुपये रेडी रखाे.' हे एेकताच घरचे लाेक प्रचंड घाबरले. त्यानंतर वारंवार फाेन करून ' क्या साेचा है, यकीन नहीं अाया ताे अपनी बेटी से बात कराे,' असे सांगत कुटुंबीयांशी मुलीचे बाेलणेही संशयितांनी करून दिले. 'अब यकीन अाया क्या, किसीकाे कुछ बताना नहीं, नहीं ताे लडकी जिंदा नहीं मिलेंगी,' असा दम दिला. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्वरित सातपूर पाेलिस ठाणे गाठून सहायक पाेलिस निरीक्षक याेगेश देवरे, उपनिरीक्षक शांतिलाल चव्हाण व उपनिरीक्षक एच. डी. राऊत यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी लागलीच उपायुक्त श्रीकृष्ण काेकाटे, सहायक अायुक्त सचिन गाेरे अाणि वरिष्ठ निरीक्षक राजेश अाखाडे यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू करण्यात अाला. तांत्रिक माहितीच्या अाधारे पाेलिसांनी सातपूर पाेलिस, इंदिरानगर पाेलिस व गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने एका अल्पवयीन संशयितासह साहिल महिंद्र भांगरे (२०, रा. पाथर्डीफाटा) यास ताब्यात घेतले.

 

नऊ तासांच्या परिश्रमानंतर संशयित ताब्यात : माेबाईलच्या क्रमांकावरून पाेलिसांनी दाेन पथके तयार करत चाळीसगाव व जळगावकडे रवाना केली. पथकाने माेबाईल क्रमांकावरून संशयिताच्या घराजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. मात्र, त्याचा माेबाईल चाेरून गुन्ह्यात वापरल्याची बाब समाेर अाली. त्यामुळे पाेलिसांना तपासाची दिशा बदलावी लागली. पाेलिसांनी मुलीच्या संपर्कातील मित्र-मैत्रिणींना विश्वासात घेऊन चाैकशी केल्यानंतर फाेन चाेरीस गेलेल्या युवकाकडून मिळालेल्या वर्णनाच्या अाधारे संशयिताचे रेखाचित्र तयार केले. त्यानंतर पाथर्डी फाटा परिसरात एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले. पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व प्रकार पाेलिसांसमाेर कथन केला. त्यानुसार दुसरा संशयित साहिल पाेलिसांच्या हाती लागला. त्यानंतर त्याच परिसरात एका फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या मुलीस ताब्यात घेण्यात अाले. तब्बल नऊ तासांच्या परिश्रमानंतर पााेलिसांना यश अाले.

 

पुढील स्‍लाइडवर चित्रांच्‍या माध्‍यमातून जाणून घ्‍या घटनाक्रम...

 

 

 


 

 

बातम्या आणखी आहेत...