आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • संभाजी भिंडेंचा मॅंगो बाईट..\'माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते\' Sambhaji Bhide Said Many Couples Had Children By Eating Mangoes In My Farm

अांबे खाल्ल्याने मुलं हाेत असल्याचा दावा; संभाजी भिडेंविराेधात तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अांब्याचे फळ खाल्ले तर ज्यांना मूल हाेत नाही त्यांना मूल हाेतं, असा चमत्कारिक दावा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी रविवारी नाशिकच्या सभेत केला हाेता. त्यावरून राज्यात वादंग उद्भवले असून चाेहाेबाजूंनी टीकेची झाेड उठली अाहे.

 

हे विधान  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीलाच अाव्हान देणारे असल्याचे सांगत लेक लाडकी अभियानाचे पदाधिकारी गणेश बाेऱ्हाडे यांनी भिडेंविराेधात कुटुंब कल्याण कार्यालयाचे पुणेस्थित अतिरिक्त संचालकांकडे तक्रार दाखल केली अाहे. यावरून १५ दिवसांच्या अात भिडेंवर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला अाहे,  तर भिडेंचे वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अाहे. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी केली अाहे.  


बाेऱ्हाडे यांनी तक्रारीत म्हटले अाहे की, अशाप्रकारे वक्तव्य करणे म्हणजे गर्भलिंगनिदान कायद्याच्या कलमांचा भंग अाहे. भिडे यांनी असे वक्तव्य करून कायद्याचा भंग केला असल्याने त्यांच्याविरुद्ध याेग्य न्यायालयात गुन्हा दाखल करावा. सदर पत्र हे कलम २८ (१) (ब) नुसार पंधरा दिवसांची नाेटीस अाहे, असे समजण्यात यावे. पंधरा दिवसांच्या अात संबंधितांवर कारवाई न केल्यास अापण गुन्हेगारास पाठीशी घालत अाहाेत म्हणून अापणासह व संबंधित व्यक्तींविराेधात याेग्य त्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नाेंद घेण्याचा इशाराही तक्रार अर्जात देण्यात अाला अाहे. 

 

काय म्हणाले हाेते भिडे ?  

वाशी तालुक्यातील माझ्या एका शेतकरी मित्राकडे अांब्याच्या १०७ चांगल्या जाती अाहेत. तो मला अास्थेवाइकपणे भेटायला अाला. त्याने सांगितले की, काेयीपासून आंब्याचे राेपटे वाढविले. ज्या जाेडप्यांना लग्नानंतर ८- १० वर्षे हाेऊनही मूल झाले नाही, अशांनी या झाडाचा अांबा खाल्ला की मूल निश्चित हाेते. १८० पेक्षा जास्त जाेडप्यांना या झाडाचे अांबे खायला दिले व पथ्य सांगितले. त्यातील १५० पेक्षा जास्त  जाेडप्यांना अपत्यप्राप्ती झाली. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच हाेताे. ही बाब त्या मित्राने त्याच्या अाईला व मलाच सांगितली. मीदेखील त्याच्याकडून दाेन अांबे अाणून शेतात लावले अाहेत. नपुंसकत्वावर अाणि वंध्यत्व निवारणाला ताकद देणारा हा अांबा अाहे, असे भिडे म्हणाले होते.

 

कायदा काय सांगताे?

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यातील कलम २२ नुसार, काेणत्याही प्रकारे लिंग निवडीची कृती करणे वा तशा हालचाली करणे वा तसे संकेत देणे ही बाब गर्भनिदानाला खतपाणी घालणारी अाहे. भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याने या कलमाचे उल्लंघन झाले असल्याचा दावा तक्रारदार बाेऱ्हाडे यांनी केला अाहे. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, भिडेंचे वक्तव्य म्हणजे महिलांचा अपमान : सुळे....

बातम्या आणखी आहेत...