आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एकनाथ खडसेंसाठी BJP म्हणजे \'जीना यहाँ मरना यहाँ\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणजे 'जीना यहाँ, मरना यहाँ', असे झाले आहे. त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत, ते पक्ष कधीच सोडू शकत नाही, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुनगंटीवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल आले होते.

 

मुनगंटीवार यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत तर खडसे यांच्यावर अन्याय कसा होईल? खडसे नाराज आहेत. या संदर्भात आपण स्वत: त्यांच्याशी बोलणार आहे.

 

भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार...

छगन भुजबळ यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्‍यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या फाईलवरील स्वाक्षरीबाबतच्या वक्तव्याचाही मुनगंटीवार यांनी खरपूस समाचार घेतला. बाळासाहेबांच्या अटकेच्या फाईलवर स्वाक्षरी करताना भुजबळांनी भुजबळ यांनी आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करून सही करायला हवी होती. कोणत्याही मंत्र्याला आपण डोळे झाकून सही केली असं म्हणण्याचा अधिकार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, छगन भुजबळ काय म्हणाले होते बाबासाहेबांबाबत?

बातम्या आणखी आहेत...