आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Breaking: नाशिकजवळ भाविकांच्या मिनी ट्रॅव्हलवर काळाचा घाला... 10 जागीच ठार; 11 जण जखमी Truck And Mini Bus Accident Near Nasik Photo News And Updates

PHOTOS: नाशिकजवळ भाविकांच्या मिनी ट्रॅव्हलरवर काळाचा घाला..10 जागीच ठार; 11 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड- मध्य प्रदेशातील उज्जैन येथून देवदर्शन करुन कल्याणकडे परतणार्‍या भाविकांच्या मिनी ट्रॅव्हलरवर आज (गुरुवार) सकाळी काळाचा घाला घातला. मिनी ट्रॅव्हलर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलगा आणि 7 महिलांचा समावेश आहे.

 

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. चांदवड येथील सोमा टोलवेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृत व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

 

सोग्रसजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर वाळूच्या ट्रकचे टायर पंक्चर झाल्यामुळे ट्रक (एमएच15- सीके 8422) हा रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी सकाळी 6 वाजेच्या सुमारास भरधाव वेगात मुंबई बाजूकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच 05-आर 0357) उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण आहे की, मिनी ट्रॅव्हलरचा चक्नाचूर झाला आहे. कल्याणमधील भाविक मध्य प्रदेशातील उज्जैन येथून देवदर्शन करुन घराकडे परतत होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... नाशिक जिल्ह्यातील सोग्रसजवळ झालेल्या अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो

बातम्या आणखी आहेत...