आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता माेदी सरकारला माफ करणार नाही : धनंजय मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण- सध्या बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकऱ्याचे कर्ज जसेच्या तसे आहे. वीज भारनियमन वाढले अाहे. नोटाबंदी त्रासदायक ठरली असून सर्वसामान्यांना एक-दोन रुपयांसाठी बँकेच्या लाइनीत उभे केल्याने जनता मोदी सरकारला माफ करणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 


कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या मेळाव्यात मुंढे बोलत होते. यावेळी सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, जयंत पाटील, डॉ भारती पवार, नितीन पवार, प्रेरणा बलकवडे, जनार्दन भोये यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. सुनील तटकरे यांनी माजी मंत्री ए.टी. पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादीला दिलेले मताधिक्य विसरणे अशक्य असल्याचे सांगत राष्ट्रवादीसोबत राहण्याचे आवाहन केले. 

 

यावेळी जयश्री पवार, प्रवीण रौंदळ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार पंकज भुजबळ, जयंत जाधव, दीपिका चव्हाण, दिलीप बनकर, राजेंद्र भामरे, सुनीता पगार, चित्रा वाघ, कौतिक पगार, रवींद्र देवरे, अॅड. संजय पवार, अनिता जैन, जितेंद्र पगार, जयेश पगार, प्रवीण पवार, शरद गुंजाळ, अमित पाळेकर, अमोल पगार, सुभाष शिरोडे, नारायण हिरे, राजेंद्र पवार, राकेश बोरसे, राहुल पाटील, संदीप वाघ, रामा पाटील उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...