आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसान सभेचा महामाेर्चा उद्या विधान भवनावर धडकणार! मागण्या मान्य होईपर्यंत घेराव घालणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने शेतकरी व अादिवासींचा नाशिक येथून काढलेला लाँग मार्च शनिवारी ठाण्यात पोहोचला. १२ मार्चला हा महामाेर्चा विधान भवनावर धडकेल. मागण्या मान्य हाेईपर्यंत घेराव घालण्याची रणनीती माेर्चेकऱ्यांनी आखली आहे.


६ मार्च रोजी निघालेल्या या महामाेर्चात हजारो शेतकरी सहभागी आहेत. मुंबईत पोहोचल्यावर शेतकरी विविध मागण्यांसाठी विधान भवनाला घेराव घालतील, असे डाॅ. अजित नवले म्हणाले. कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्या, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोग, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी द्यावे, बोंडअळी व गारपीटग्रस्तांना एकरी ४० हजार रुपये भरपाई, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा म्हणून तातडीने हस्तक्षेप करावा, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. किसान सभेचे डाॅ. अजित नवले व अामदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, अर्जुन आडे, सुनील मालुसरे महामोर्चाचे नेतृत्व करत आहेत. 

 

कम्युनिस्टांच्या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा!
ज्या कम्युनिस्टांना विरोध करून शिवसेनेने राजकारण केले त्यांच्याच शेतकरी मोर्चाला पाठिंबा देऊन शिवसेनेने सगळ्यांना चकित केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांना सुविधा पुरवल्या. तर, दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला असून रविवारी ते मुंबईच्या वेशीवर मोर्चाचे स्वागत करणार आहेत.

 

शेतकऱ्यांनीच अाणला शिदा 

या महामाेर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी भोजनासाठी लागणारा आपला शिदा स्वत: सोबत आणला आहे. अन्न शिजविण्याची व्यवस्थाही शेतकऱ्यांनी आपसात गट करून स्वत: च केली अाहे. दररोज ३० ते ३५ किलोमीटर चालण्याचे नियोजन आहे.

 

बातम्या आणखी आहेत...