आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तलाकच्या विरोधासाठी मालेगावी लाखो मुस्लिम महिलांचा मूकमोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- इस्लामी शरियत हमारा सन्मान है, हम कानूने शरीयत के कटिबध्द है, हम तलाक बिल की वापसी चाहते है अशा अाशयाचे फलक हाती घेऊन लाखाेंच्या संख्येने मूकमाेर्चात सहभागी मुस्लिम महिलांनी गुरुवारी येथे तीन तलाक विधेयकास कडाडून विराेध केला. इस्लामी शरियत अाम्हाला मान्य असल्याचे केंद्र सरकारला त्यांनी ठणकावून सांगितले. 


तीन तलाकबंदी विधेयक संसदेत मंजूर झाले असून, राज्यसभेत ते मंजुरीच्या प्रतीक्षेत अाहे. या कायद्यात मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करत तलाक देणाऱ्यास तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात अाली अाहे. मात्र, केंद्र सरकार इस्लामी शरियतमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा अाराेप करत अाॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डने या विधेयकास विराेध दर्शविला अाहे. हे विधेयक हाणून पाडण्यासाठी देशभरात मुस्लिम महिलांचे माेर्चे काढले जात अाहेत. पर्सनल लाॅ बाेर्डच्या अावाहनानुसार गुरुवारी मालेगाव शहरातही महिलांचा मूकमाेर्चा काढण्यात अाला. दुपारी अडीच वाजता एटीटी हायस्कूलपासून माेर्चाचा प्रारंभ करण्यात अाला. माेर्चा जुना बसस्थानक, माेसमपूलमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात अाला. 


माेर्चात लाखाेंच्या संख्येने महिलांचा जनसागर उसळला हाेता. माेर्चाचे पहिले टाेक अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर शेवटचे टाेक जुना बसस्थानकालगत हाेते. माेसम नदीवरील दाेन्ही पूल माेर्चेकरी महिलांनी व्यापले हाेते. माेर्चाच्या प्रारंभी असलेल्या रफिया बिन्त अब्दुल खालिक, ताहेरा रशिद शेख, अायेशा अब्दुल कादिर उस्मानी, अाफ्सा अासिफ शेख, शबाना मुख्तार शेख, सबिना मुजम्मील वफाती, नाजमीन अारिफ हुसैन, शान-ए-हिंद, अन्सारी हुमा काैसर फकरुद्दीन, अनिका फरहीन अब्दुल मालिक, शाकेरा हाजी माेहम्मद युसूफ व सायराबानाे शाहिद अहमद या दहा महिलांच्या हातून प्रांताधिकारी अजय माेरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात अाले. यावेळी मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डचे जनरल सचिव माैलाना उमरैन महेफूज रहेमानी, अामदार अासिफ शेख, माजी अामदार मुफ्ती माेहंमद इस्माइल यांनी माेर्चेकरी महिलांना संबाेधित केले. माेर्चाच्या नियाेजनासाठी हजाराेंच्या संख्येने तरुण स्वयंसेवक ठिकठिकाणी तैनात करण्यात अाले हाेते. पाेलिस प्रशासनाने कडक बंदाेबस्त ठेवला हाेता.

 
पंतप्रधान माेदींवर टीका 
इस्लामने महिलांना सर्वाधिक अधिकार दिले अाहेत. मात्र, मुस्लिम महिलांवर अत्याचार हाेतात असे चित्र उभे करून शरियतमध्ये हस्तक्षेप केला जात अाहे. महिलांच्या हक्काची चिंता व्यक्त करणारी व्यक्ती अापल्या पत्नीचे अधिकार हिरावून पंतप्रधानपदावर बसली अाहे. अगाेदर अापल्या पत्नीस न्याय द्यावा, मग मुस्लिम शरियतचा विचार करावा असे सांगत अाॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डचे जनरल सचिव माैलाना उमरैन महेफूज रहेमान यांनी पंतप्रधान माेदींवर टीका केली. 


महिलांना पाणीवाटप 
माेर्चात सहभागी महिलांना अनेक सामाजिक संघटनांनी पाणीवाटप केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी पुतळा, छावणी पाेलिस ठाणे परिसरात पाणी पाऊच व बाटल्या ठेवण्यात अाल्या हाेत्या.

 
शिस्तीचे दर्शन 
शहरात प्रथमच मुस्लिम महिला एखाद्या कायद्यास विराेध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या हाेत्या. माेर्चापूर्वी अाठवडाभर शहरात झालेल्या महिलांच्या बैठकांमध्ये शिस्त ठेवण्याचे अावाहन करण्यात अाले हाेते. त्यानुसार महिला अत्यंत शिस्तीने सहभागी झाल्या. 


पूर्व भागात शुकशुकाट 
माेर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूर्व भागात शुकशुकाट दिसून अाला. माेर्चा मार्गावरील दुकानांसह किदवाई राेड, बसस्थानक परिसरातील व्यवसाय बंद ठेवण्यात अाले हाेते. पाेलिसांनी अनेक भागांतील रस्ते बॅरिकेडिंगद्वारे बंद केली हाेती. बसेस नवीन बसस्थानकातून दरेगावमार्गे बाहेर पाठविण्यात अाल्या. जुना अाग्राराेड, कॅम्पराेड, सटाणाराेड दाेन तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात अाल्याने नागरिकांची काहीशी गैरसाेय झाली. 

बातम्या आणखी आहेत...