आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Woman\'s Day: कर्करोगाशी दिली झुंज, आता मिळाले सौदर्यासाठी अनेक पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नमिता ही नाशिकची राहणारी आहे. - Divya Marathi
नमिता ही नाशिकची राहणारी आहे.

नाशिक- आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला नाशिकच्या एका अशा महिलेविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत जिने स्तन कॅन्सरसारख्या एका जीवघेण्या आजाराचा सामना केला आहे. या महिलेने आपल्या आत्मविश्वासाच्या आणि सौदर्याच्या जोरावर देश-विदेशात केवळ नावच कमावले नाही तर 5 आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळवले आहेत. 

 

 

17 तासाच्या शस्त्रक्रियेला जावे लागले सामोरे
- आम्ही तुम्हाला नाशिकच्या 35 वर्षीय नमिता कोहक यांनी कॅन्सरचा कसा मुकाबला याची माहिती देत आहोत. ज्यावेळी त्यांना कॅन्सर झाला त्यावेळी त्या अवघ्या 26 वर्षाच्या होत्या.
- कॅन्सर झाल्यावरही हिंमत न हारता त्यांनी कॅन्सरचा मुकाबला केला. मुंबईतील जे. जे. हॉस्पीटलमध्ये सुमारे 17 तास त्यांच्यावर कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

 

कुटूंबाने दिली नेहमीच साथ

- नमिता यांचे लग्न नाशिकमधील पारितोष कोहक यांच्यासोबत झाले. त्यांना त्याच्या कुटूंबाची नेहमीच उत्तम साथ लाभली.
- कॅन्सर झाल्यावरही परितोष यांनी नमिताला हिंमत न हरता अनेक सौदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रेरित केले. 

 

 

अनेक सौदर्य स्पर्धांमध्ये मिळाले यश
- नमिताने मिसेस वर्ल्ड यूनाइटेड 2017, मिसेस वर्ल्डवाइड क्वीन, हाँगकाँग, मिसेस इंडिया फोटोजेनिक 2015 हे पुरस्कार मिळवले आहेत.
- नमिताने सांगितले की वयाच्या 9 व्या वर्षापासून त्या सौदर्य स्पर्धेत भाग घेत आहेत. लहान असतानाही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

 

 

कॅन्सर पीडितांची सेवा करत आहे नमिता
- कॅन्सरसारख्या रोगावर मात करणाऱ्या नमिता या एका कंपनीच्या मालकिनही आहेत. त्यांनी अनेक कॅन्सर पीडितांची मदतही केली आहे.
- कॅन्सर पीडितांची आपण यापुढेही मदत करु असे त्यांनी म्हटले आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...