आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात दोन अपघात: नाशकात 12 वर्षांची मुलगी ठार, यावलमध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमधील सातपूर रस्त्यावर रविवारी सकाळी 10 वाजता अपघात झाला. - Divya Marathi
नाशिकमधील सातपूर रस्त्यावर रविवारी सकाळी 10 वाजता अपघात झाला.

नाशिक/यावल - नाशिकमधील त्र्यंबक रोडवर रविवारी सकाळी टाटा-407 वाहनाने 12 वर्षांच्या मुलीला जोरदार धडक दिली. गायकवाड नगर येथील रहिवासी रुकसा अन्सारीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. यात दोन जणा गंभीर जखमी आहेत. 


सातपूर महापालिकेच्या विभागीय कार्यालया जवळ रविवारी सकाळी 10 वाजता गायकवाड नगर येथील रुकसा रस्ता ओलांडत होती. तेव्हा भरधाव वेगात असलेल्या टाटा 407 वाहनाने रुकसाला जोरदार धडक दिली. या अपघतात रुकसा जागेवरच गतप्राण झाली. 


दोन ट्रकची समोरासमोर धडक, जखमींना बाहेर काढण्यास लागला अर्धा तास 
यावल तालुक्यातील वाघोदा गावाजवळ दोन ट्रकची समोरा समोर धडक झाली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जिल्हा सामान्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
- अपघात इतका भीषण होता की जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास तब्बल अर्धातास लागला. जेसीबीच्या सह्याने ट्रक वेगळे करुन जखमींना बाहेर काढण्यात आले.

 

असा घडला अपघात 
- अपघात रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर राज्य मार्गावर वाघोद गावाजवळ चोपड्याकडील वळण रस्त्यावर झाला. 
- यावलकडून चोपड्याकडे जाणारा ट्रक ( सी. जी. 04 जे. डी.5795) चोपड्याकडून यावलकडे येणाऱ्या ट्रकवर (एम. एच. 11 एम. 4039) आदळला. 

बातम्या आणखी आहेत...