आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलपांना दीड लाखांचा गंडा;व्हीव्हीअायपी नंबर देण्याच्या अामिष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- देवळाली मतदार संघातून सलग तीन वेळा अामदारकी,  युती सरकारच्या काळात समाजकल्याण मंत्रीपद, शिवसेनेचे उपनेतेपद, लाेकप्रतिनिधीत्व अाणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बबनराव घाेलप यांना दाेन भामट्यांनी १ लाख ३३ हजारांना गंडा घातल्याचे उघडकीस अाले अाहे. व्हीव्हीअायपींसाठी असणारा माेबाइल क्रमांक, त्याबराेबर अायफाेन देताे असे अामिष दाखवून त्यांना फसवण्यात अाले  घाेलप यांच्या फिर्यादीवरून नाशिकराेड पाेलिस ठाण्यात रविवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात अाला. 


घाेलप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले अाहे की, भारती एअरटेल कंपनीत व्यवस्थापक असल्याचे भासवून दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना ८४४४४४४४४४ हा व्हीआयपी माेबाइल क्रमांक आणि आयफोन -एक्स हा मोबाइल देण्याचे अामिष दाखवले. त्यासाठी तुम्हाला जीएसटीसह १ लाख ३३ हजार १२० रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात अाले. या दाेघांनी सांगितलेल्या स्कीमनुसार भारती एअरटेल एन्टरप्राईजेस, कल्वार रोड, जयपूर शाखा (बँक खाते क्रमांक ४१८१०५५०००४१) या खात्यावर घाेलप यांनी ५० हजार रुपये,  तसेच संतोष राठोड,  कोटक महिंद्रा बँक, वैशालीनगर, जयपूर शाखा (खाते क्रमांक २८१२०१२३२५) या खात्यात अाधी ५४ हजार आणि नंतर २९ हजार १२० रुपये अारटीजीएस अाणि नेट बंॅकिंगद्वारे भरले. पैसे जमा झाल्यानंतर संबधितांनी एसएमएसद्वारे नाशिक येथील भारती एअरटेल िल. काॅर्पाेरेट अाॅफिस, रिध्दी पार्क, मनोरथ हाॅटेल समोर, राजीव गांधी भवन शेजारी येथून मोबाइल ताब्यात घेण्यास सांगण्यात अाले. या पत्त्यावर गेल्यावर तेथे संबंधित कार्यालय अस्तित्वातच नसल्याचे लक्षात अाले. २० नोव्हेंबर २०१७ पासून सातत्याने दोघांनी ज्या माेबाइल क्रमांकांवरून संपर्क साधला हाेता, त्यावर सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संबंधितांचे फोन सुरु असून त्यावर काेणीहंी प्रतिसाद दिला नाही. ८४४४४४४४४४  हा व्हीआयपी क्रमांक देण्यात येणार हाेता. त्यावरूनही या दाेघांनी बाेलणे केले हाेते. मात्र नंतर त्या क्रमांकावरही संपर्क न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात अाले.

 

तुम्ही काय काळजी घ्याल

तुम्हालाही कोणत्याही अनोळखी नंबरवरून कोणतीही माहिती विचारण्यासाठी फोन आला तर स्वत: बद्दलची कोणतीही माहिती देऊ नका.

 

बबनरावांची ‘साडेसाती’ संपेना
भ्रष्टाचाराच्या अाराेपांनंतर न्यायालयाने दाेषी ठरवल्यामुळे बबनराव घाेलप यांना २०१४ ची निवडणूक लढवता अाली नव्हती. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या दोन्ही कन्यांचा अल्प मतांनी पराभव झाला.  शिवसेनेने नुकतेच कमी अनुभव असलेल्या पदाधिकाऱ्यांनाही नेतेपद दिले. मात्र उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ शिवसैनिक असूनही घोलप यांना अजूनही उपनेतेपदच अाहे.  त्यातच आता पुन्हा दाेघांनी फसविल्यामुळे घोलप यांच्या मागील साडेसाती संपण्याचे नाव घेत नसल्याची चर्चा सुरू हाेती.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...