आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोईमतूरपाठोपाठ नाशिक होणार डिफेन्स इनोव्हेशन हब; केंद्रीय मंत्री डाॅ. सुभाष भामरे यांची घाेषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- संरक्षण अन् हवाई उत्पादन क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळण्यासाठी देशात कोईमतूरपाठोपाठ नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब स्थापण्याची घाेषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केली. नाशिक अाणि अहमदनगर जिल्ह्यांत डिफेन्स हबची क्षमता असून, त्याच अनुषंगाने येथील उद्याेगांना संरक्षण उत्पादनाशी जाेडण्याच्या संधीबद्दल १५ जून राेजी महत्त्वाचे चर्चासत्र नाशिकमधील हाॅटेल एमराल्ड पार्क येथेे होत आहे. त्यासंदर्भात माहिती देताना डॉ. भामरे बोलत होते. 


संरक्षण इनोव्हेशन हबच्या माध्यमातून स्टार्टअप, वैयक्तिक इनोव्हेटर्स, संशोधन अन् विकास संस्था यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. संरक्षणविषयक उत्पादनांशी निगडित नसलेल्या लघुउद्योगांनादेखील त्याचा लाभ होईल. संरक्षण व हवाई क्षेत्राशी निगडित उद्योगांमधून ४० ते ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन सार्वजनिक उद्योगांतून आज होत असून उरलेले "आउटसोर्स' करण्यात येते. 


असा हाेणार फायदा 
संरक्षण क्षेत्राला गरजेच्या उत्पादनांबाबतचे संशाेधन इनोव्हेशन हबमध्ये साकारु शकेल. स्टॅण्डअप अाणि स्टार्टअप्सला सरकारतर्फे ९० टक्क्यांपर्यंत निधी दिला जातो. केंद्र सरकारने इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स योजना अाणली आहे. त्यासाठी डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून "ना नफा ना तोटा' तत्त्वावर निधी उपलब्ध करून दिला जातो. स्थानिक उद्याेजकांना याचा फायदा घेऊन नवनवी उत्पादने विकसित करता येऊ शकतील. 

बातम्या आणखी आहेत...