आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक मैत्रीतून तरूणीने हैदराबादेत गाठले, वय कमी म्हणून प्रियकर तरूणाने केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मित्र-मैत्रिणी बनवण्यासाठी फेसबुक हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून अनेक युजर्सला चांगले-वाईट अनुभव आले आहेत. असाच अनुभव नाशिकमधील एका अल्पवयीन मुलीला आला. हैदराबाद येथील तरुणासोबत फेसबुकवर झालेल्या मैत्रीचे प्रेमांत रूपांतर झाले, मात्र हैदराबाद येथे गेल्यानंतर प्रत्यक्ष भेटीनंतर त्या मित्राचा भ्रमनिरास झाल्याने त्याने नम्रपणे या मुलीला नकार देत परत पाठवून दिल्यानंतर तिने हताश मनाने सुरत गाठले. 


शहरातील पंचवटी परिसरातील एका अल्पवयीन मुलगी सुरत येथे मिळाल्याची माहिती सुरत पोलिसांकडून मिळाली. पथकाने सुरत येथे जाऊन या मुलीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिस अधिकारी चक्रावले. या मुलीने फेसबुकवर हैदराबादच्या मुलासोबत मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवस फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून ओळख वाढवली. यानंतर प्रत्यक्ष फोनद्वारे बोलणे सुरू झाले. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याने मुलीने त्या तरुणाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हैदराबादला कसे जायचे याची माहिती त्या मुलाने दिली. घरातून मुलीने काही पैसे घेत हैदराबादला रेल्वेमार्गे गेली. तेथे पोहाेचल्यानंतर आनंदाने मित्राला फोन केला. मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी काही वेळात तो रेल्वेस्थानकावर पोहाेचला. मात्र, काही वेळातच प्रत्यक्ष मुलीला पाहिल्यानंतर त्या युवकाचा भ्रमनिरास झाला. आपल्यापेक्षा वयाने लहान असल्याने त्या युवकाने मुलीला नम्रपणे नकार दिला. तिला जेवण आणि काही पैसे देऊन रेल्वेमध्ये बसवून दिल्यानंतर ती सुरतला पोहाेचली. सुरत रेल्वे पोलिसांना ती आढळून आली. चौकशीत तिने नाव-पत्ता सांगितला. पंचवटी पोलिसांशी संपर्क केला. मुलाचा फोटो पाठवल्यानंतर मुलीचे ओळख पटली. काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. तिचा शोध सुरू होता. पथकाने सुरत येथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले. 

 

अाभासी जगातून बाहेर पडावे 
सोशल मीडियाचा वाढत्या अतिरेकामुळे मुले-मुली अाभासी जगात वावरत आहेत. अशाचप्रकारे ही मुलगी बळी पडली. सुदैवाने त्या तरुणाने मुलीचा गैरफायदा घेतला नाही. पोलिसांना ती सुखरूप मिळाली. पालकांनी मुलांवर लक्ष देणे गरजेचे आहे. 
- मधुकर कड, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी 

बातम्या आणखी आहेत...