आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: समाजकंटकांच्या त्रासामुळे सामान्य रुग्णालयात रिक्तपदांचा प्रश्न कायम; मानेंचा धक्कादायक निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- विभागीय अायुक्त राजाराम माने यांनी मंगळवारी सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. २४ एप्रिलच्या भेटीत समितीने सामान्य रुग्णालय व महापालिका रुग्णालयांमधील रिक्त पदे तसेच अपुऱ्या बेडमुळे अाराेग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याचे स्पष्ट केले हाेते. काही स्थानिक कार्यकर्ते व समाजकंटकांच्या त्रासाने कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना काम करण्यात अडचणी येत अाहे. परिणामी रिक्त जागांवर नवीन व्यक्ती येण्यास धजावत नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष विभागीय अायुक्त माने यांनी काढला अाहे. रिक्त जागांचे खापर समाजकंटकांच्या नावे फाेडून सरकारच्या उदासीनतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न हाेत असल्याचे दिसत अाहे. 


मालेगाव मधील सामान्य रुग्णालय, महापालिका रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या अाराेग्यसेवांचा पुरता बाेजवारा उडाला अाहे. याविषयी येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश भामरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली अाहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने चार सदस्यीय समिती गठित करत त्यांना अहवाल सादर करण्याचे अादेश दिले अाहेत. समितीने मागील पाहणी अहवाल २ मे राेजी न्यायालयात सादर केला. येत्या १५ जूनला पुढील सुनावणी हाेणार असल्याने विभागीय अायुक्त माने यांच्यासह अन्य सदस्यांनी मंगळवारी पाहणी करत अाढावा घेतला. सामान्य रुग्णालयातील रिक्तपदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याच्या सूचना करण्यात अाल्या अाहेत. मात्र, अाचारसंहिता सुरू असल्याने ही प्रक्रिया रखडल्याची माहिती अायुक्त माने यांनी दिली. मनपाच्या तिन्ही रुग्णालयांमधील रिक्त जागांचा प्रश्नही कायम अाहे. या जागा भरण्यास मंजुरी मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्यात अाली अाहे. तसा अहवालही सादर केला असल्याचे महापालिका अायुक्त संगीता धायगुडे यांनी सांगितले. रिक्त पदे भरण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असले तरी समाजकंटकांचा वाढता त्रास अाराेग्यसेवेत अडथळा ठरत अाहे. कर्मचाऱ्यांना विनादबाव काम करता यावे यासाठी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींची बैठक घेत या प्रकारांना अाळा घातला जाणार अाहे. 


रुग्णालय परिसरात २४ तास पाेलिस बंदाेबस्त पुरविण्याची मागणी करणार असल्याचेही महसूूल अायुक्त राजाराम माने यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. पाहणीप्रसंगी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मनपा अायुक्त संगीता धायगुडे, महापाैर रशिद शेख, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. किशाेर डांगे, उपायुक्त अंबादास गर्कळ, प्रदीप पठारे, विलास गाेसावी, डाॅ. अनिस माेमीन, नितीन पाेफळे, याचिकाकर्ते राकेश भामरे उपस्थित हाेते. 


रुग्णालयांचे प्रस्ताव सादर 
मालेगाव शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय २०० बेडचे अाहे. महापालिकेच्या अली अकबरमध्ये पाच तर वाडिया रुग्णालयात ३० बेडची व्यवस्था करण्यात अाली अाहे. मालेगाव शहरातील विविध उद्याेग धंद्यासह वाढती लाेकसंख्या लक्षात घेता रुग्णालयांत बेडची संख्या वाढणे गरजेचे झाले अाहे. सामान्य रुग्णालय परिसरात नव्याने १०० तर महापालिका क्षेत्रात ५० बेडचे रुग्णालय सुरू करावे, असा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात अाला असल्याची माहिती विभागीय महसूल अायुक्त राजाराम माने यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिली. 


शहरातील खासगी डाॅक्टरांना अावाहन 
सामान्य रुग्णालय व महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अाजमितीस एकूण ३६३ पदे रिक्त अाहे. शहरातील खासगी डाॅक्टरांनी धर्मार्थ किंवा चॅरिटेबल स्वरूपात काही तासांसाठी या रुग्णालयात वैद्यकीय सेवा द्यावी, यासाठी विशेषकरून प्रयत्न केले जात अाहे. याबाबत डाॅक्टर असाेसिएशनची बैठक घेऊन खासगी डाॅक्टरांशी चर्चा केली जाणार अाहे. 


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दाैऱ्यांचा फक्त फार्स 
मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यापासून रुग्णालयांची पाहणी व बैठका झडत अाहे. तत्कालीन विभागीय अायुक्त एकनाथ डवले यांनी २६ अाॅक्टाेबर २०१६ ला सुविधांचा अाढावा घेतला हाेता. यानंतर उपसचिव शंकर जाधव यांनी पाहणी केली हाेती. अाता तिसऱ्यांदा विभागीय अायुक्त माने यांनी भेट दिली. केवळ पाहणीचा फार्स करून कागदी घाेडे नाचवून न्यायालयाची दिशाभूल केली जात अाहे, असा अाराेप सर्वसामान्यांकडून केला जात अाहे. 


या त्रुटींचे करण्यात अाले निराकरण 
रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात २४ तास वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात अाली अाहे. या ठिकाणी चार शवपेटी उपलब्ध करण्यात अाल्या अाहेत. वेटिंग शेडकामाची निविदाप्रक्रिया सुरू झाली अाहे. स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला अाहे. पुरेसा अाैषधसाठा उपलब्ध अाहेत. इतर सुविधाही लवकरच पूर्ण हाेतील, असे महसूल अायुक्त राजाराम माने यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...