आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवहाराअभावी 3.30 लाख जनधन खाती लाभांना मुकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'पंतप्रधान जन-धन' योजनेचे निव्वळ खाते उघडण्यात आले आहे. मात्र, नुसत्या नाशिक जिल्ह्यात तब्बल तीन लाख ३० हजार ९६ खात्यांवरून कुठलेही व्यवहार होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाते उघडल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत व्यवहार न केल्यास विमा योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केलेले आहे. यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ३० हजार ९६ खातेधारक विम्यापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे. 


जन-धन योजनेतील खातेदाराचा अाकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला एक लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात येणार असल्याचे बँकांना शासनाने कळविले आहे. खात्यावर जमा असलेल्या रकमेवर व्याज, कुठलीही अनामत ठेव न घेता शून्य पैशावर खाते उघडणे, पाच हजार रुपयांपर्यंत कर्ज, घरखरेदी अथवा निर्मितीसाठी कर्ज, शिक्षण-कृषी अथवा कृषी विषयाशी निगडित उद्योग उभारणीसाठी कर्ज विविध सुविधा देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने ज्या उद्देशातून जन-धन योजना सुरू केली, तो उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे. वास्तविक ही योजना सुरू करताना कोणतीही माहिती बॅँकांना दिली गेलेली नाही. सुरुवातीला फक्त खाते उघडून आणि जुजबी माहिती देऊन योजनेचा श्रीगणेशा करण्यात अाला. याेजनेस प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र, फक्त झिरो बॅलन्सची खाती उघडली गेल्याने कुठलाही व्यवहार झालेला नाही. 


त्यामुळे केंद्र सरकारच्या उद्देशाप्रमाणे पैसा चलनात आलेला नाही. खाते उघडल्यानंतर व्यवहार करणाऱ्या ग्राहकाला पाच ते पंधरा हजारांपर्यंत कर्जपुरवठा केला जाणार आहे. मात्र, याविषयी बहुतांश नागरिकांना माहितीच नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे झिरो बॅलन्सची खाती अधिक असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात तब्बल तीन लाख ३० हजार ९६ खात्यांवरून कुठलेही व्यवहार होत नसल्याचे दिसून आले आहे. 


अशी आहे आकडेवारी 
जिल्हाभरात एकूण जनधन खाती १४,०४,९२४ 
ग्रामीण भागातील खाती : ८,६५,७४८ 
शहरी भागातील खाती : ५,३९,१७६ 
शून्य व्यवहार केलेली खाती ३,३०,०९६ 


व्यवहार केल्यावर मिळणार लाभ 
जनधन खात्यावर जमा असलेल्या रकमेवर व्याज, पाच हजार रुपयांपर्यंत कर्ज, घरखरेदी अथवा निर्मितीसाठी कर्ज, शिक्षण-कृषी अथवा कृषी विषयाशी निगडित उद्योग उभारणीसाठी कर्जसुविधा देण्यात येणार आहेत. मात्र, या सुविधांसाठी ग्राहकांनी खात्यांचा वापर करणेदेखील गरजेचे आहे. अनेक खातेधारक खाते वापरत नाही. 
- भरत बर्वे, मुख्य व्यवस्थापक, बँक अाॅफ महाराष्ट्र 


विम्याबाबत बँकांसह ग्राहकही अनभिज्ञ 
खाते उघडणाऱ्या ग्राहकाला एक लाखाच्या अपघात विम्याचे कवच देण्यात आले आहे. मात्र, हा निधी कसा दिला जाईल याविषयी बँकादेखील अनभिज्ञ आहेत. नागरिकांमध्ये योजनेविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे योजनेचा उद्देश पोहाेचत नसल्याने संभ्रमावस्था आहे. ४५ दिवसांपर्यंत खात्यावरून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना विमा योजनेचा लाभ दिला जाणार नाही. व्यवहार नसलेल्या खातेदारांना कर्जसुविधाही मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. 


अनेकांना रुपे कार्डचे वाटप नाही 
जिल्हाभरात जनधन योजनेंतर्गत १४ लाख ४ हजार ९२४ खाते उघडली गेली. यापैकी केवळ सात लाख ४९ हजार ५६२ खातेधारकांना रुपे कार्डचे वाटप करण्यात आले. यामु‌ळे ग्राहकांनी या खात्यांवर व्यवहार करणे टाळल्याचेही चित्र दिसून आले. 

बातम्या आणखी आहेत...