आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्तांना जाळ्यात अडकविण्याचा विराेधकांचा प्रयत्न फसला, महासभेत 'मुंढे अागे बढाेच्या' घाेषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्पष्ट बहुमताने सत्तेत अालेल्या भाजपवर कुरघाेडी करण्यासाठी अंदाजपत्रकाच्या निमित्ताने अायुक्त तुकाराम मुंढे यांना बळ देण्यासाठी महासभेत त्यांच्या समर्थनार्थ भाषण करण्यापासून तर त्यांना चेतवण्यासाठी 'मुंढे अागे बढाे'च्या घाेषणा देण्याची विराेधकांची खेळी मंगळवारी निष्प्रभ ठरली.

 

अायुक्त मुंढे यांनी विराेधकांच्या समर्थनाला धुडकावून लावत शहरहितासाठी स्थायी समितीवर अर्थसंकल्प पाठवून प्रशासकीय चुणूकही दाखवून दिली. परिणामी मुंढे हे तर जाळ्यात फसले नाहीच, मात्र उद्या विराेधकांची कामे राेखल्यास त्यांच्याविराेधात संघर्ष करताना 'मुंढे अागे बढाे'च्या घाेषणा अडचणीच्या ठरतील, अशी भीती विराेधकांनाच वाटू लागली अाहे.

 

अायुक्त म्हणून मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वाधिक दणके सत्ताधारी भाजपला कामकाजातून दिले अाहे. महासभेवरील प्रस्ताव मागे घेणे, गरज, तांत्रिक याेग्यता व तरतूद या त्रिसूत्रीच्या अाधारे २५७ काेटींच्या रस्त्यांच्या कामांना ब्रेक लावणे असे अनेक निर्णय त्यांनी घेतले अाहे. नगरसेवक निधी हा विषयही संपुष्टात अाला अाहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता असून अापली कामे नाही झाली तरी चालेल, मात्र सत्ताधाऱ्यांना ब्रेक लागला या खुशीत विराेधकही अाहेत. त्यातून मुंढे हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील म्हणून दाखल झाले असले तरी, विराेधकांनी विराेधी पक्षनेते हे पद अापसूकच त्यांना बहाल करून दाेघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशीच भूमिका घेतल्याचे चित्र अाहे. त्यातून अर्थसंकल्पाच्या निमित्ताने झालेला प्रतिष्ठेचा विषयात राजकीय पाेळी भाजून घेण्याची संधी मंगळवारी विराेधकांना मिळाली.

 

स्थायी समितीवर अर्थसंकल्प कसा मांडला पाहिजे यासाठी भाजपने कायदेशीर युक्तिवाद सुरू केल्यावर विराेधकांनी वारंवार त्यात व्यत्यय अाणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून सत्ताधाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडत असताना अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करीत अवराेध निर्माण करण्यासारखे प्रकारही हाेऊ लागले. प्रथम अंदाजपत्रक महासभेच्या पटलावर दाखल करून घ्या, अायुक्तांना म्हणणे मांडू द्यावे, असेही डाव टाकले गेले. अर्थसंकल्प एकदा महासभेवर दाखल झाला तर स्थायीवर पाठवता येणार नाही व अर्थसंकल्प दाखलच करायचे नाही तर अायुक्तांना म्हणणे मांडायची गरज नाही, ही बाब अाेळखत महापाैरांनीही विराेधकांना दादच दिली नाही. परिणामी, भाजपने अर्थसंकल्प स्थायी समितीवर पाठवण्यासाठी स्पष्ट भूमिका घेतल्याचे लक्षात अाल्यावर राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी थेट मुंढे यांनाच हुकूमी एक्का बनवल्याचे चित्र दिसले.

 

मुंढेसाहेब यांनी एकदा पाऊल टाकले की माघारी न येण्याची भूमिका अाहे. हे अायुक्त काेणाचे एेकणार नाही. तुमचेच बजेट निश्चित हाेईल, असे सांगत प्राेत्साहन दिले. महापाैरांनी अर्थसंकल्प स्थायीवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यावर सभागृहात थेट 'मुंढेसाहेब अागे बढाे'च्या घाेषणाही दिल्या गेल्या. इकडे शिवसेनेने 'दादागिरी नही चलेगी'च्या घाेषणा सुरू केल्या.

 

विराेधकांनी घेतली भेट, मात्र मुंढे यांची समंजस भूमिका
अायुक्तांना बाेलू दिले नाही, या मुद्याची ढाल करत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी महासभा संपल्यानंतर मुंढे यांची भेट घेतली. त्यांच्यामागे उभे राहण्याची ग्वाहीही दिली. मात्र, मुंढे यांनी समंजस भूमिका घेत अर्थसंकल्प स्थायी समितीवर पाठवण्याचा निर्णय घेतला. माध्यमांशी बाेलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट काेणतीही टिप्पणी व्यक्त केली नाही. त्यामुळे मुंढे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर वार करण्याचा विराेधकांचा डाव उलटल्याचे चित्र हाेते.  

 

बातम्या आणखी आहेत...