आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकहून पुण्यासाठी अाज हाेणार पहिल्या विमानाचे उड्डाण, पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक विमानतळावरून बहुप्रतिक्षीत विमानसेवेला अाजपासून प्रारंभ हाेत अाहे. सायंकाळी वाजून २० मिनिटांनी पुण्यासाठी पहिले विमान उड्डाण हाेईल. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ हाेणार अाहे. यावेळी खासदार हेमंत गाेडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह लाेकप्रतिनिधी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहतील. शिवसेेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

 

केंद्र शासनाच्या ‘उडान’ याेजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीकडून १९ अासनी विमानाव्दारे नाशिक-पुणे अाणि नाशिक-मुंबई या दाेन मार्गांवरही सेवा सुरू हाेत अाहे. २९ डिसंेबरपर्यंत सर्व तिकिटांची विक्री झाल्याचे कंपनीच्या संकेतस्थळावरून दर्शविले जात असल्याने या सेवेला नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट हाेत अाहे. अाेझर येथे उभारण्यात अालेल्या विमानतळावर दाेन दिवसांपासून या उद‌्घाटन साेहळ्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...