आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावी परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्याचा खून, पत्नी फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- अक्सा काॅलनीत राहणाऱ्या सज्जाद अालम बशीर अालम (३५) या परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांचा निर्घृण खून करण्यात अाला. घटनेनंतर घरातील लाखाे रुपयांच्या रकमेसह सज्जादची दुसरी पत्नी फरार झाल्याने तिच्यावर संशय व्यक्त हाेत अाहे. 


बिहार राज्यातील किराया गावचा रहिवासी असलेला सज्जाद अालम मालेगाव शहरातील अक्सा काॅलनीत वास्तव्यास हाेता. त्याने पहिल्या पत्नीस फारकत देऊन अायेशानगर भागात राहणाऱ्या नादियाशी महिनाभरापूर्वी विवाह केला हाेता. चार दिवसांपूर्वी डाळिंब व्यवसायातून मिळालेली लाखाेंची रक्कम घरात अाणून ठेवली हाेती. बुधवारी त्याने पत्नीला जेवणासाठी बाहेरही नेले हाेते. गुरुवारी सकाळी सज्जादचा मित्र त्याच्या घरी गेला असता सज्जादचा मृतदेह अाढळून अाला. त्याच्या डाेक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून अाले. घरातील माैल्यवान वस्तू व राेख रक्कमही गायब असल्यामुळे पाेलिसांनी नादियावर संशय व्यक्त करून तिचा शाेध सुरू केला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...