आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात तालुक्यात पाऊस, तर आठ तालुके कोरडेच; जिल्ह्यात रविवारी ४६९ मिलीमीटर पाऊस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिक जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने धरणसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील फक्त सातच तालुक्यामध्ये पाऊस झाला असून उर्वरित आठ तालुके कोरडेच राहिल्याने त्या तालुक्यामधील खरिपाची पेरणी धोक्यात आली आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात एकूण ४६९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात अाली. 


जिल्ह्यात शनिवार मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यात एकाच दिवशी १५२, त्र्यंबकेश्वर ९९, पेठ ८७, नाशिक ५२ तर सुरगाणा तालुक्यात ३६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मात्र, येवला, नांदगाव, चांदवड, बागलाण, देवळा, मालेगाव हे तालुके कोरडेच राहिले. गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणात ३,८३६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन रविवारी सायंकाळपर्यंत ६८.१३ टक्क्यापर्यंत गेला. 


दारणा धरणामध्ये ४,३९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन ६१ टक्क्यापर्यंत नोंद करण्यात आली होती. जिल्ह्यात पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा या धरणामध्ये पाणीसाठा वाढला असला तरी गतवर्षाच्या तुलनेत अद्यापही चार ते पाच टक्क्यांनी कमी आहे. जिल्ह्यामध्ये सर्वत्र हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत असला तरी मुसळदार पावसाची गरज नागरिकांना आहे. शेतकरी या पावसाची पेरण्यांसाठी अातुरतेने वाट पाहत अाहेत. 


इगतपुरीत २४ तासांत १५२ मिमी पाऊस 
पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात अात्तापर्यंत १४१४ मिमी पावसाची नाेंद करण्यात अाली. गत चार दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. भात लागवडीच्या कामाला वेग आला असल्याने शेतकरी कामात व्यस्त झाला आहे. इगतपुरीत १५२ मिमी, घोटी ८१ मिमी, वाडीवऱ्हे ७४ मिमी, नांदगाव ६८ मिमी, टाकेद ४३ मिमी तर धारगावला १३० मिमी पाऊस पडल्याची नाेंद झाली अाहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे मुकणे धरणात ११२४, कडवा धरणात ४३८, भावली धरणात ९५४ तर सर्वात माेठ्या असलेल्या दारणा धरणात ४३९६ दलघफू पाणीसाठा झाला अाहे. 


तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर) 
नाशिक ५२.१ 
इगतपुरी १५२.० 
त्र्यंबक ९९.० 
दिंडोरी २०.० 
पेठ ८७.५ 
सुरगाणा ३६.५ 
निफाड ८.४ 
सिन्नर ५.२ 
चांदवड २.२ 
कळवण ५.० 
येवला २.० 
एकूण ४६९.९ 

बातम्या आणखी आहेत...