आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या शेतातील अांबे खाल्ल्याने मुले हाेतात; भिडेंच्या वक्तव्याच्या चाैकशीचे अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आमच्या शेतातील अांबे खाल्ल्याने मुले हाेतात हे नाशिकमध्येल केलेले चमत्कारिक वक्तव्य अाता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना चांगलेच अडचणीचे ठरणार असे दिसत अाहे. राज्य शासनाच्या कुटुंबकल्याण विभाग कार्यालयाने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अाराेग्य अधिकाऱ्यांना प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्याचे अादेश दिले अाहेत. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा समितीचे सदस्य गणेश बाेऱ्हाडे यांनी यासंदर्भात कुटुंबकल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांच्याकडे तक्रार केली हाेती. 


वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अांब्याचे फळ खाल्ले तर ज्यांना जाेडप्यांना मुलं हाेत नाही त्यांना मुलं हाेतात, असा चमत्कारिक दावा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केल्यानंतर वाद निर्माण झाला अाहे. हे विधान गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीलाच अाव्हान देणारे असल्याचे सांगत गणेश बाेऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण कार्यालयाचे पुणेस्थित अतिरिक्त संचालकांकडे संभाजी भिडे यांच्याविराेधात साेमवारी (दि. ११) तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले की, अशाप्रकारे वक्तव्य करणे म्हणजे गर्भलिंगनिदान कायद्याच्या कलमांचा भंग अाहे. भिडे यांनी असे वक्तव्य करून कायद्याचा भंग केला असल्याने त्यांच्याविरुद्ध याेग्य न्यायालयात गुन्हा दाखल करावा. सदर पत्र हे कलम २८ (१) (ब) नुसार पंधरा दिवसांची नाेटीस अाहे, असे समजण्यात यावे. 


पंधरा दिवसांच्या अात संबंधितांवर याेग्य ती कारवाई न केल्यास अापण गुन्हेगारांना पाठीशी घालत अाहाेत असे समजून अापणासह व संबंधित व्यक्तीविराेधात याेग्य त्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येईल. याची नाेंद घेण्याचा इशाराही करण्यात अालेल्या तक्रार अर्जात देण्यात अाला हाेता. त्यानुसार कुटुंबकल्याण विभागाने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अाराेग्याधिकाऱ्यांना जिल्हा समुचित प्राधिकारी या नात्याने संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत खातरजमा करून त्यांच्यावर याेग्य ती कार्यवाही करावी व अामच्या कार्यालयास याेग्य ताे अहवाल तत्काळ सादर करावा, असे अादेशित करण्यात अाले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...