आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्तश्रृंग गडावरील ट्रॉलीची सेवा पाडव्यापासून; देशातील पहिलाच प्रयाेग, केवळ 80 रुपये भाडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या  फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या फायर ऑडिट, गर्दी व्यवस्थापन आणि लिफ्टच्या सुरक्षेची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर्णपणे खात्री करून सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे खासगी कंपनीस नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे  गुढीपाडव्यापासून ही ट्रॉली भाविकांच्या सेवेसाठी सज्ज हाेईल. त्यामुळे मंदिरापर्यंत जाण्यासाठी ५०० पायऱ्या चढण्यापासून भाविकांची सुटका हाेईल. तसेच    देवीचे  दर्शन आता केवळ तीन मिनिटांतच होणार आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या यंत्रणेचे अाैपचारिक उद‌्घाटन हाेण्याची शक्यता अाहे. सप्तशृंगी देवीचे मंदिर पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर अाहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, अाजारी लाेकांना दर्शनासाठी जाताना अनंत अडचणी येतात. पण आता या ट्रॉलीमुळे त्यांनाही थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येईल.    

 

ताशी १२०० व्यक्तींची वाहतूक

- १७६ मीटर लांबीचा मार्ग तयार   
- पायथ्यापासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत  ट्रॉलीद्वारे भाविकांना जाण्याची व्यवस्था   
- तीन मिनिटांत घेता येणार दर्शन.    
- दोन ट्रॉलींमुळे येण्याजाण्याची स्वतंत्र व्यवस्था असून  एका वेळी ६० भाविकांची व्यवस्था होईल.    
- प्रतितास १२०० व्यक्तींची होणार वाहतूक.   
- हाँगकाँग कोडप्रमाणे डिझाइन केले आहे. भारतात हा कोड नाही.  
- प्रकल्पासाठी ३१.४३ कोटी खर्च.   
- २ वर्षांचे हाेते प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, मात्र प्रत्यक्षात लागली ४ वर्षे  
- खासगीकरणातून उभारणी. एका भाविकास ८० रुपये व लहान मुलास ४० रुपये भाडे  
- २० वर्षे ७ महिने कंपनी भाडे आकारेल. त्यानंतर ट्रस्टकडे हस्तांतरण हाेईल. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सप्तश्रृंगी गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली...

बातम्या आणखी आहेत...