आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइगतपुरी- पर्यटनस्थळ म्हणून विकसित हाेत असलेल्या इगतपुरीजवळील तळेगाव शिवार अश्लील पार्ट्यांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले असून मिस्टिक व्हॅली रिसॉर्टमध्ये बंगला क्र. ९ च्या परिसरात रविवारी (दि. १८) मध्यरात्री अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या सहा तरुणींसह १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, नाशकातील कथित पत्रकार संघाच्या अध्यक्षाचा वाढदिवसानिमित्त हे अश्लील नृत्य सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले.
मिस्टिक व्हॅली रिसॉर्ट परिसरात मद्याच्या नशेत तरुणी आणि तरुण घुंगरू बांधून अश्लील हावभाव करत असल्याची माहिती रात्रीच्या गस्त पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता माेठ्या अावाजात डीजे वाजवत त्याच्या तालावर ताल धरत मद्यधुंद तरुण-तरुणी नाचताना अाढळून अाले. त्यांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले असता संशयितांनी अाम्ही पत्रकार अाहाेत, अामच्या थेट मंत्र्यांपासून ते तुमच्या पाेलिस अधीक्षक, अायजींशी अाेळखी अाहेत, तुम्ही अामचे काहीच करू शकत नाही, असे म्हणत धुडगूस घातल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिंगटे यांनी सांगितले. त्याचबराेबर इतरांचीही चाैकशी सुरू केली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे देत पाेलिसांवर अरेरावीचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र स्थानिक गुन्हे शाखा अाणि इगतपुरी पाेलिसांचे पथक घटनास्थळी बाेलावून त्यांनी सर्व संशयितांना अटक केली.
१६ संशयितांना अटक व जामीन
संशयितांमध्ये डॉ. राहुल मगनलाल बागमार उर्फे जैन, अनिल लक्ष्मण बर्गे, लक्ष्मण राजेंद्र पवार, प्रकाश पांडुरंग गवळी, अर्जुन दत्तात्रय कवडे, बासू मोहन नाईक , आकाश राजेंद्र गायकवाड, हर्षद विजयकुमार गोठी, चैतन्य दत्तात्रय कवरे, काशी अनंतलाल पंडित (सर्व. रा. नाशिक), कविता प्रकाश जाधव, रसिका नाईक, दिलायला फ्रॅकी गोजावीस, नीलम भारती सिंग, आफशा सर्फराज शेख, तोमा शागो शेख (सर्व रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात अाले. दरम्यान, संशयितांकडून बंधपत्राद्वारे हमी घेत जामिनावर साेडण्यात अाले. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद गोसावी, सचिन देसले, गणेश वराडे, मारुती बोराडे करत अाहेत.
गुन्हा दाखल हाेणार
मिस्टिक व्हॅलीतील बंगला क्रमांक ९ च्या अावारात तरुणी अश्लील नृत्याचा प्रकार सुरू हाेता. याप्रकरणी संबंधित बंगला मालकाचा शाेध घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. संबंधित पत्रकाराने अरेरावी केल्याने गाेंधळ वाढला.
- राजेश शिंगटे, वरिष्ठ निरीक्षक
यापूर्वीही तीनदा पडले होते रिसॉर्टवर छापे
मिस्टिक रिसॉर्टमध्येच २७ मार्च २०१७ ला ६ बारबालांसह ७ तरुणांना अटक करण्यात आली होती. याचबराेबर बलायदुरी शिवारातील रेन फॉरेस्ट येथे ४ ऑक्टोबर २०१७ ला ८ जणांसह ७ तरुणींना ताब्यात घेण्यात आले हाेते. वर्षभरातील ही तिसरी घटना असल्याने संबंधित हॉटेल मालक व बंगले मालकांवर कठाेर कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी हाेऊन सर्वत्र परिसराची बदनामी हाेऊन फटका बसू शकताे, अशी भीती स्थानिक व्यावसायिक व पर्यटकांनी व्यक्त केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.