आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- एसटी महामंडळाच्या महिला वाहक कर्मचाऱ्यांना यापुढे प्रसूती रजा १८० दिवस तसेच अतिरिक्त ३ महिन्यांची रजा अशी एकूण ९ महिन्यांची रजा मिळणार आहे. विशेष म्हणजे एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला वाहक कर्मचाऱ्यांनासुध्दा याचा लाभ दिला जाणार आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या वतीने यापूर्वी महिला कर्मचाऱ्यांना प्रसुतीसाठी १८० दिवस प्रसूती रजा देण्यात येत होती. मात्र गरोदर महिला वाहक कर्मचाऱ्यांचा ड्युटीमुळे गर्भपात झाल्याच्या तक्रारी थेट परिवहन मंत्र्यासह राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत महिला वाहक कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या प्रसूती रजामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारित नियमानुसार वाहक महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसाबरोबरच अतिरिक्त तीन महिने अधिक प्रसूती रजा देण्यात येईल. प्रसूती रजा संपल्यानंतर आवश्यकता असल्यास महिला वाहकांच्या खाती जमा असणारी सरासरी वेतनावरील रजाही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता मंजूर करण्यात येणार आहे.
त्या महिला कर्मचाऱ्यांना बैठे काम
महिला वाहक कर्मचाऱ्यांना गरोदरपणाच्या कालावधीत पहिल्या चार महिन्यांपर्यंत मानसेवी वैद्यकीय अधिकारी व स्त्री रोग तज्ज्ञ यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या अाधारे महिला वाहकाच्या शैक्षणिक अर्हतेच्या अधिक राहून बैठे काम देण्यात येणार आहे. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकारी विभागीय पातळीवर देण्यात आला आहे.
या नवीन सुधारणा
- मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रसूती रजेपैकी किती व कोणत्या कालावधीत रजा घ्यावी हे ठरविण्याचे अधिकार संबधित महिला वाहक कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
- उपरोक्त सवलत दिल्याबाबतची नाेंद संबंधित महिला वाहक कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात विभाग प्रमुखांनी करावी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.