आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये रॅगिंग? रुममेट्सच्या त्रासाला कंटाळून जळगावच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/जळगाव- रुममेट्सच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून जळगाव येथील रहिवासी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुभम पाटील (वय-20, रा. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आडगाव परिसरात ही घटना घडली असून आज (शुक्रवार) उघडकीस आली.

 

सूत्रांनुसार, शुभम पाटील हा बीएससी अॅग्रीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. तो जळगावहून शिक्षणासाठी नाशिकला आला होता. आडगाव परिसरातील त्याने भाड्याने घेतली होती. शुभमने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.  मृतदेहाशेजारी सुसाइड नोट आढळली आहे. रुममेट्स त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते, हे सुसाइड नोटच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

 

'माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याकडून काम करुन घेत होते', असा उल्लेख शुभम याने आत्महत्या करण्‍यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये केला होता.

 

वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

शुभमच्या वडिलांच्या तक्रारीनंतर चार विद्यार्थ्यांविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम याला आत्महत्येस त्यांनीच प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...